Wheat Agrowon
Image Story

वाढत्या तापमानातही अधिक उत्पादन देणारे वाण

कृषी संशोधकांनी वाढत्या तापमानात तग धरणाऱ्या पीबीडब्ल्यू-८२६ गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

Team Agrowon
Wheat Production

मागच्या रब्बी हंगामातील तापमानवाढीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधकांनी वाढत्या तापमानात तग धरणाऱ्या पीबीडब्ल्यू-८२६ गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

Heatwave

रब्बी पिकांवरील संशोधन आणि विस्तार या विषयावर आयोजित दोन दिवशीय प्रदर्शनात कृषी विद्यापीठातर्फे या वाणाची माहिती देण्यात आली.

Punjab Agricultural University

मागच्या रब्बी हंगामात तापमानात झालेल्या वाढीमुळे गव्हाचे मोठे नुकसान झाले होते. ज्याचा मोठा फटका पंजाबसह सर्वच राज्यातील गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता.या पार्श्वभूमीवर पंजाब कृषी विद्यापीठाने वाढत्या तापमानात तग धरू शकणारे पीबीडब्ल्यू-८२६ हे गव्हाचे नवे वाण विकसित केले आहे.

Wheat Production

मागच्या चार वर्षांपासून पीबीडब्ल्यू-८२६ या वाणाच्या चाचण्या घेतल्या असून हे नवे वाण १४८ दिवसांत विकसित करण्यात आले आहे. हे वाण सध्या राज्य सरकारच्या समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले असून त्यांनतर ते प्रत्यक्ष वापरासाठी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पंजाब कृषी विदयापीठाच्या संशोधन विभागाचे संचालक डॉ. अजमेर सिंग दत्त यांनी सांगितले.

Wheat

एचडी ३०८६ आणि एचडी २९६७ या गव्हाच्या साधारण वाणापेक्षा पीबीडब्ल्यू-८२६ या वाणाचा गहू आकाराने ३१ टक्के मोठा आहे. तसेच एचडी ३०८६ आणि एचडी २९६७ या वाणांच्या तुलनेत या नवा वाणापासून १७ टक्के अधिक उत्पादन मिळत असल्याचे यावेळी कृषी संशोधकांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT