Ujani Dam : उजनी धरणातून धाराशिवसाठी एक टीएमसी पाणी राखीव; नागरिकांचा पाणीटंचाईचा प्रश्न सुटणार!
Dharashiv News : सोलापूर भीषण पाणीटंचाईच्या उंबरठ्यावर असलेल्या धाराशिव जिल्ह्याला राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी उजनी धरणातून एक टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा शासन आदेश (जीआर) जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्याची पुढील दहा महिन्यांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यास मोठी मदत होणार आहे.
maharashtra water resources department ujani dam newsAgrowon