Sugarcane cutting machine Agrowon
Image Story

Sugarcane:शेतकऱ्यांचा कल यंत्रांमार्फत ऊस तोडणीकडे

यंदा सर्व कंपन्यांची मिळून सुमारे साडेतीनशे ऊस तोडणी यंत्राची (Sugarcane Cutting Machine) विक्री अपेक्षित आहे. गेल्या वर्षी ६० ते ७० यंत्रांची विक्री झाली होती.

Devendra Shirurkar
Sugarcane cutting machine

सध्या राज्यात सुमारे ६०० हून अधिक ऊसतोडणी यंत्र विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी करत आहेत. प्रत्येक वर्षी तोडणी यंत्रातील त्रुटी दूर करत अनेक कंपन्यांनी गेल्या दहा वर्षांत यंत्रे बाजारात आणली. उसाची उपलब्धता कमी जास्त असल्याने यंत्राच्या मागणीत सातत्य राहिले नाही.

Sugarcane cutting machine

गेल्या हंगामात मराठवाड्याला मोठा फटका सहन करावा लागला. ऊसतोडणी आवरत नसल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखान्यांनी आपली ऊसतोडणी यंत्रे मराठवाड्यात पाठवून हंगाम संपवण्यासाठी प्रयत्न केले.

Sugarcane cutting machine

त्यामुळे यंदा ऊसतोडणी यंत्राला मोठी मागणी आहे. मजूर मिळत नसल्याने शेतकरी यंत्राच्या मदतीने ऊस तोडणी करण्याचा विचार करतात.

Sugarcane cutting machine

यंत्रामुळे बऱ्याच ठिकाणी ऊसतोडणी चांगल्या प्रकारे झाली. हा अनुभव लक्षात घेऊन आता मराठवाड्यातील लातूर, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून प्रामुख्याने ऊसतोडणी यंत्राची चौकशी कंपन्यांकडे होत आहे.

Sugarcane cutting machine

साधारणतः सव्वा कोटी रुपयांपर्यंत ऊसतोडणी यंत्राच्या किमती असतात. अनुदान नसल्याने काही शेतकरी एकत्र येऊन ही ऊसतोडणी यंत्रे खरेदी करण्याच्या तयारीत आहेत.ज्या भागात उसाचे क्षेत्र जास्त आहे, त्या भागात यंत्राने तोडणी सुलभ होत आहे. त्यामुळे कारखान्यांनी यंत्राला पसंती दिल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT