Rice Agrowon
Image Story

खाद्यसंकट टाळण्यासाठी बांगलादेशकडून तांदळाची खरेदी

बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून (Government to Government- G2G) तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेसारखे खाद्य संकट (Food Crisis) निर्माण होऊ नये या भीतीने बांगलादेश चढ्या दराने तांदूळ आयात करत आहे.

Team Agrowon
Paddy Cultivation

बांगलादेश सरकारने भारताकडून एक लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात तांदळाचा तुटवडा पडला आहे.

Paddy Cultivation

तांदळाची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी बांगलादेशची भारतावर भिस्त आहे. बांगलादेशकडून मागणी वाढल्यामुळे भारतीय तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.

Paddy Cultivation

बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या अन्न महामंडळाने भारत सरकारसोबत तांदूळ खरेदी करार केला आहे.

Paddy

या करारानुसार बांगलादेश सरकार ४२२ डॉलर प्रति टन दराने (वाहतूक खर्च वगळता) भारताकडून उकडा तांदूळ खरेदी करणार आहे. बांगलादेश सरकार भारताखेरीज दक्षिण-पूर्व आशियायी देशांतूनही तांदूळ खरेदी करणार आहे.

Paddy

यावर्षी बांगलादेशात प्रतिकूल हवामानामुळे भाताच्या पिकाला फटका बसला आहे. तिन्ही हंगामात तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेख हसीना सरकारने देशात तांदळाचा पुरेसा साठा करण्यासाठी कंबर कसली आहे.

Rice Stock

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) मते बांगलादेश यावर्षी ६.५ लाख टन तांदूळ आयात करण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षेचा विचार करून बांगलादेश सरकारने तांदळावरील आयातशुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Crushing : विनापरवाना कारखान्यांनी गाळप केल्यास कारवाई

Areca Nut Farming: सुपारी बागायतदार शेतकरी संकटात

Solapur Water Crisis : सोलापूर जिल्ह्यात १०८ गावांना ९८ टँकरने पाणी पुरवठा

Sindhudurg Rain Update: वैभववाडी, दोडामार्गात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस

Jowar Farming: दुष्काळात रब्बी ज्वारीची लागवड कशी करावी?

SCROLL FOR NEXT