Rain Alert Agrowon
Image Story

Rain Alert: कोकण, विदर्भात मुसळधार!

बंगालच्या उपसागरात ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत अतितीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) सक्रिय आहे. मंगळवारी (ता. ९) हे केंद्र ओडिशाच्या भुवनेश्‍वरपासून ७० किलोमीटर वायव्येकडे होते.

Team Agrowon
Heavy Rain

कमी दाबाचे क्षेत्र, दक्षिणेकडे असलेला मॉन्सूनचा आस, किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा यासह पूरक प्रणालीमुळे आज (ता. १०) विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.

Heavy Rain

कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्याचा घाटमाथा आणि विदर्भातील वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ आहे. तर उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि तुरळक ठिकाणी विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

Heavy Rain

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा आणखी दक्षिणेकडे सरकला आहे. गुजरातच्या नालियापासून तीव्र कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगाल उपसागर ते उत्तर अंदमान समुद्रापर्यंत विस्तारला आहे.

Heavy Rain

गुजरात ते केरळ किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा आहे. महाराष्ट्राच्या मध्य भागात पूर्व-पश्‍चिम वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT