मोहिनी जाधव, सरपंच
मोहिनी जाधव, सरपंच 
ग्रामविकास

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठेवले दागिने गहाण

ज्ञानेश उगले

नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या काळात किंवा शौचालय उभारणीसाठी महिलेने दागिने गहाण ठेवल्याचे किंवा विकल्याचे आपण वाचतो, दूरचित्रवाणीवर बघतोदेखील. मात्र,  नाशिक तालुक्‍यात अव्वल दर्जाची ग्रामपंचायत असा नावलौकिक असलेली निर्मल ग्राम पुरस्कारप्राप्त व विविध विकासकामांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या एकलहरेच्या सरपंच मोहिनी जाधव यांना कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवावे लागले, कारण कर्मचाऱ्यांची दिवाळी कडू होऊ नये यासाठी... एकलहरे ग्रामपंचायतीस दर वर्षी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कारखान्याची कलम १२५ नुसार ठोक अंशदानरूपी घरपट्टी एप्रिलच्या अखेरपर्यंत जमा होत असे. महाराष्ट्र शासनाने कलम १२५ रद्द करून कलम १२४ नुसार रेडिरेकनरच्या दराने घरपट्टी वसूल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वीजनिर्मिती कंपनीला घरपट्टीची आकारणी करून बिल देण्यात आले. वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा घरपट्टीतून सूट मिळावी, हे कारण पुढे करून वीजनिर्मिती प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक परिस्थिती खालावून तिजोरीत खडखडाट निर्माण झाला. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवण्याचे अतिरिक्त साधन नसल्याने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन थकले. प्रशासकीय खर्च, छोट्या-छोट्या विकासकामांची बिल देयके रखडल्याने ग्रामपंचायतीचा कारभार चालवणेसुद्धा अवघड होऊन बसले आहे. त्यात दिवाळीसारखा मोठा सण असल्याने ज्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर ग्रामपंचायतीचा कारभार चालतो,  त्यांच्या कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, या उद्देशाने सरपंच मोहिनी जाधव यांनी स्वत:च्या मंगळसूत्रासह इतर दागिने गहाण ठेवत कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय घेतला.  या निर्णयाबाबत त्यांनी  सासरे दिलीप जाधव आणि पती संदीप जाधव यांना सांगितले. त्यांनी आनंदाने या निर्णयास संमती देत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील आनंद हीच आपली दिवाळी असल्याचे सांगितले. सौ. जाधव यांनी मंगळसूत्रासह दागिने बॅंकेकडे गहाण ठेवत एक लाख ७५ हजार रुपये जमवले. त्याचा धनादेश ग्रामसेवक भाऊसाहेब वाघ यांच्याकडे सुपूर्त करीत त्वरित कर्मचाऱ्यांचा पगार अदा करण्याचे सूचित केले. ग्रामपंचायतीमध्ये काम करताना करातून मिळणारे उत्पन्न महत्त्वाचे असते. एकलहरे ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीद्वारे करण्यात येणारा करभरणा हा महत्त्वपूर्ण वाटा होता. परंतु तो आजतागायत मिळालेला नाही. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी करभरणा करण्याचे आदेश देऊनसुद्धा संबंधित प्रशासन करभरणा करण्यास टाळाटाळ करीत आहे. रात्रंदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला. - मोहिनी जाधव, सरपंच

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT