Fresh Fruit 
फळबाग

भारतातून ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ ; पेरूची निर्यात २६० टक्के वाढली

भारतातील ताज्या फळांच्या निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची निर्यात मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतातून होणाऱ्या पेरूची निर्यातीत २०१३ पासून आतापर्यंत २६० टक्क्यांची वाढ झाली आहे.

टीम ॲग्रोवन

नवी दिल्ली - भारतातील ताज्या फळांच्या निर्यातीत (Export Of Fresh Fruit) लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण ताज्या खाद्यपदार्थांच्या श्रेणीत द्राक्षांची निर्यात (Grape Export) मोठ्या प्रमाणात झाली आहे. भारतातून होणाऱ्या पेरूची निर्यातीत (Guava Export) २०१३ पासून आतापर्यंत २६० टक्क्यांची वाढ झाली आहे. एप्रिल ते जानेवारी २०१३-१४ मध्ये ५.८ लाख अमेरिकी डॉलर्स इतक्या किमतीचे पेरू निर्यात करण्यात आले होते. या तुलनेत २०२१-२२ मध्ये याच कालावधीत २०.९ लाख अमेरिकी डॉलर्स मूल्याच्या पेरूची निर्यात करण्यात आली आहे. सरकारी वृत्तसंस्था पीआयबीने या बाबतचे वृत्त दिले आहे.  भारतीय अमरूद को मिल रहे नये बाज़ार, किसान हो रहे समृद्ध और खुशहाल! pic.twitter.com/f8zoKWAdXq

— Piyush Goyal (@PiyushGoyal)

भारतातून होणाऱ्या ताज्या फळांची निर्यात वाढली असून द्राक्षांची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. २०२०-२१ मध्ये ३१४० लाख अमेरिकी डॉलर्स इतक्या ताज्या द्राक्षांची निर्यात करण्यात आली. याशिवाय ३०२० लाख अमेरिकी डॉलर्सची इतर ताजी फळे, ३६० लाख अमेरिकी डॉलर्सचे आंबे (Mango), १९० लाख अमेरिकी डॉलर्सची सुपारीची पाने आणि फळे निर्यात (Fruit) करण्यात आली. भारताच्या ताज्या फळांच्या एकूण निर्यातीत ताजी द्राक्षे आणि इतर ताज्या फळांचा वाटा हा तब्बल ९२ टक्क्यांचा आहे.

भारतातून २०२०-२१ मध्ये निर्यात करण्यात आलेली ताजी फळे मुख्यतः बांगलादेश (१२६६ लाख डॉलर्स), नेदरलँड्स (१७७५ लाख डॉलर्स), संयुक्त अरब अमिरात (१००६ लाख डॉलर्स), युके (४४३ लाख डॉलर्स), सौदी अरेबिया (२४७ लाख डॉलर्स), ओमान (२२३ लाख डॉलर्स) आणि कतार (१६५ लाख डॉलर्स) या देशांना पाठविण्यात आली. २०२०-२१ मध्ये निर्यात करण्यात आलेल्या ताज्या फळांपैकी ८२ टक्के फळे प्रमुख १० देशांना निर्यात करण्यात आली.

याशिवाय दही आणि पनीर (इंडियन कॉटेज चीज) यांच्या निर्यातीत देखील २०० टक्के इतकी प्रचंड वाढ झाली आहे. एप्रिल ते जानेवारी २०१३-१४ मध्ये या वस्तूंची निर्यात १ कोटी डॉलर्स इतकी होती. या तुलनेत त्यात वाढ होऊन एप्रिल ते जानेवारी २०२१-२२ मध्ये ३ कोटी डॉलर्सची निर्यात झाली.

भारत के दही व पनीर का स्वाद, विश्व को भाये ये उत्पाद। सरकार के प्रयासों से, बढ़ रहा निरंतर इनका निर्यात। pic.twitter.com/k46ILABejJ

— Piyush Goyal (@PiyushGoyal)

दुग्धजन्य वस्तूंच्या निर्यातीत गेली पाच वर्षे  १०.५ टक्के चक्रवाढ दराने वार्षिक वाढ झालेली दिसून येत आहे. वर्ष २०२१-२२ मध्ये (एप्रिल ते नोव्हेंबर) भारताने १८१७ लाख डॉलर्स इतक्या किंमतीची दुग्धजन्य उत्पादने निर्यात केली आहेत. तर विद्यमान आर्थिक वर्षात गेल्या वर्षीपेक्षा अधिक निर्यात होईल, असा अंदाज आहे.

भारतातून २०२१-२२ मध्ये ज्या देशांना दुग्धजन्य उत्पादनांची प्रामुख्याने निर्यात झाली आहे  त्यात संयुक्त अरब अमिरात (३९३ लाख डॉलर्स), बांगलादेश (२४१ लाख डॉलर्स), अमेरिका (२२८ लाख डॉलर्स), भूतान (२२५ लाख डॉलर्स), सिंगापूर (१५२ लाख डॉलर्स), सौदी अरेबिया (११४ लाख डॉलर्स), मलेशिया (८६ लाख डॉलर्स), कतार (८४ लाख  डॉलर्स), ओमान (७४ लाखडॉलर्स), आणि इंडोनेशिया (१० लाख डॉलर्स) या देशांचा समावेश आहे. २०२०-२१ मध्ये निर्यात करण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थांपैकी ६१ टक्क्यांहून अधिक पदार्थांची निर्यात ही या प्रमुख १० देशांत करण्यात आली.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT