केळी पिकातील खत नियोजन 
फळबाग

केळी पिकातील खत नियोजन

प्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी बांगडी पद्धतीने खोलवर खते देऊन मातीने झाकावीत.

डॉ. के. बी. पवार, प्रा. ए. आर. मेंढे, डॉ. जे. एस. चौरे

प्रति झाड २०० ग्रॅम नत्र, ६० ग्रॅम स्फुरद व २०० ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी बांगडी पद्धतीने खोलवर खते देऊन मातीने झाकावीत. जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक

खत मात्रा देण्याची वेळ युरिया (ग्रॅम प्रति झाड) सिंगल सुपर फॉस्फेट (ग्रॅम प्रति झाड) म्युरेट ऑफ पोटॅश (ग्रॅम प्रति झाड)
लागवडीनंतर ३० दिवसांच्या आत ८२ ३७५ ८३
लागवडीच्या ७५ दिवसांनंतर ८२ ०० ००
लागवडीच्या १२० दिवसांनंतर ८२ ०० ००
लागवडीच्या १६५ दिवसांनंतर ८२ ०० ८३
लागवडीच्या २१० दिवसांनंतर ३६ ०० ००
लागवडीच्या २५५ दिवसांनंतर ३६ ०० ८३
लागवडीच्या ३०० दिवसांनंतर ३६ ०० ८३
एकूण ४३६ ३७५ ३३२

(टीप ः तक्त्यात दिलेल्या खतमात्रेस माती परीक्षण अहवालानुसार योग्य बदल करावेत.) सिंचनाच्या पाण्यातून खत व्यवस्थापन ः अधिक उत्पादनासाठी व खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रति झाड १५० ग्रॅम नत्र आणि १५० ग्रॅम पालाश व ६० ग्रॅम स्फुरद ठिबक सिंचनातून द्यावे. ठिबक सिंचनातून खत व्यवस्थापन

खतमात्रा देण्याची वेळ हजार झाडांसाठी खतांची मात्रा (किलो प्रति आठवडा) युरिया मोनोअमोनियम फाॅस्फेट म्युरेट ऑफ पोटॅश
१ ते १६ आठवडे (१६) ४.५ ६.५
१७ ते २८ आठवडे (१२) १३.५ ०० ८.५
२९ ते ४० आठवडे (१२) ५.५ ००
४१ ते ४४ आठवडे (४) ०० ००

पाणी व्यवस्थापन ः केळी पिकास ठिबक सिंचन पद्धत अत्यंत उपयोगी आहे. बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इत्यादी बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते. महिना ः पाण्याची गरज (लिटर प्रति झाड प्रति दिवस) जून ः ४.५ ते ६.५ जुलै ः ४.५ ते ६.५ आंतरमशागत ः

  • केळी बाग स्वच्छ ठेवण्यासाठी उभी-आडवी कुळवणी करावी. लागवडीनंतर ३ ते ४ महिन्यांपर्यंत अशी कुळवणी करता येते. दर २ महिन्यांनी टिचणी बांधणी करावी. झाडांना मातीची भर द्यावी.
  • केळीची पिले धारदार कोयत्याने नियमित काढावीत. रोगग्रस्त पाने कापून बागेबाहेर नष्ट करावीत. हिरवी पाने कापू नये.
  • गरजेप्रमाणे बांबूच्या काठ्या किंवा पॉलीप्रॉपिलीनच्या पट्ट्यांच्या साह्याने झाडांना आधार द्यावा.
  • रोगनियंत्रण ः (फवारणी प्रति लिटर पाणी) १) करपा (सिगाटोका) ः

  • रोगग्रस्त पाने काढून जाळावीत.
  • २.५ ग्रॅम मॅंकोझेब किंवा २.५ ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराइड अधिक १ मिलि स्टीकर किंवा
  • प्रोपीकोनॅझोल ०.५ मिलि अधिक मिनरल ऑईल १० मिलि
  • २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात
  • २) इर्विनिया रॉट (हेडरॉट) ः

  • लागवडीनंतर १०० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम काॅपर ऑक्सिक्लोराईड + ३०० मिलि क्लोरपायरीफाॅस + १५ ग्रॅम स्टॅप्टोमायसीन* यांचे द्रावण करून प्रत्येक झाडास २०० मिलि द्रावण टाकावे किंवा
  • लागवडीच्या वेळी प्रति झाड ६ ग्रॅम ब्लिचिंग भुकटी जमिनीतून द्यावी. त्यानंतर १ महिन्याच्या अंतराने पुन्हा द्यावे.
  • कीड नियंत्रण ः १) सोंडकिडे ः

  • पिकांची फेरपालट करावी. कंद प्रक्रिया करावी.
  • सापळा म्हणून खोडाचे १५ ते ३० सेंमी लांबीचे उभे काप एकरी १० ते १५ या प्रमाणात बागेत ठेवावे.
  • २) मावा ः

  • बाग तणमुक्त ठेवावी.
  • डायमेथोएट (३० इ.सी) २ मिलि + निंबोळी तेल ५० मिलि + ५ मिलि स्टीकर प्रति लिटर पाण्यात मिसळून दर ४ ते ६ दिवसांनी फवारावे.
  • ३) सूत्रकृमी ः लागवडीच्या वेळी प्रति झाड ५०० ग्रॅम ते १ किलो निंबोळी पावडर वापरावी. केळी बागेत झेंडू हे आंतरपीक घ्यावे. (टीप ः वरील सर्व कीडनाशकांना लेबल क्लेम आहे.) संपर्क ः डॉ. के. बी. पवार, ०२५७-२२५०९८६ (अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (फळे), केळी संशोधन केंद्र, जळगाव)  

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavistar AI App: ‘महाविस्तार एआय’कडे दुर्लक्ष; नोंदणीला मंद गती

    Unseasonal Rain: पश्चिम विदर्भात पूर्वमोसमीचा सलग तडाखा

    Marathwada Water Stock: मराठवाड्यात प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटतोय

    Village Story: आठवणींची फुलवात...

    El Nino Impact on Monsoon: एप्रिल महिन्यात पाऊस दणका देणार का?

    SCROLL FOR NEXT