राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार 
इव्हेंट्स

राज्यातील सहाशे गावांचा पाणी प्रश्न सोडविला : प्रतापराव पवार

टीम अॅग्रोवन

पुणे : समाजप्रबोधन, समाजशिक्षण हाच उद्देश ‘सकाळ’ने कायम ठेवला. आज दुष्काळी स्थितीत पाण्याचा प्रश्न भेडसावतो आहे. त्यावर जागरूकपणे आम्ही काम करतो आहोत. सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून लोकसहभागाच्या जोरावर आजपर्यंत ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला, असे सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी बुधवारी (ता. ८) येथे सांगितले.  सकाळ- ॲग्रोवनच्या वतीने  ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्ड’चे वितरण बुधवारी झाले. त्या वेळी श्री. पवार बोलत होते. ते म्हणाले की, केवळ शेती हाच विषय केंद्रस्थानी ठेवून ॲग्रोवनसारखे दैनिक सुरू केल्यानंतर अनेकांना त्याचे आश्चर्य वाटले. पण आज त्याला मिळालेले हे यश महत्त्वाचे आणि सर्वांच्या सहभागाचे आहे. शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्यात आणखी काही बदल हवे असतील तर शेतकऱ्यांनी त्यांच्या सूचना जरूर मांडाव्यात. त्यानुसार बदल केले जातील. सकाळ माध्यम समूह वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करते आहे. पाण्याच्या विषयावर सकाळने रिफी फंडाच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५०० ते ६०० गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवला आहे. शेतकरी प्रशिक्षित व्हावेत, कौशल्याधारित शिक्षण त्यांनी घ्यावे, यासाठी राज्य शासनाच्या सहकार्याने व्यापक प्रशिक्षण कार्यक्रम हाती घेतला आहे. त्या माध्यमातून चार लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यापैकी जवळपास एक लाख शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यातही आले आहे.  ॲग्रोवनच्या माध्यमातून दरवर्षी सरपंच महापरिषद भरवली जाते. सरपंच शहाणा झाला तर गावाच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे, हा यामागील उद्देश आहे. आत्तापर्यंत १० हजार सरपंचांना हे प्रशिक्षण दिले. त्यात महिला सरपंचांचाही सहभाग मोठा आहे. या कामात कोणतीही जात, धर्म असा भेदाभेद नसतो. केवळ समाजाचा उत्कर्ष, हाच उद्देश असतो. लोकांचा मिळालेला विश्वास आणि पाठिंबा हेच यामागील सर्वात मोठे बळ आहे, असेही श्री. पवार म्हणाले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT