Anola
Anola 
औषधी वनस्पती

पीत्त, वातावर गुणकारी आवळा

डॉ. विनिता कुलकर्णी

आवळ्यापासून सरबत, लोणचे असे विविध पदार्थही तयार करतात. औषधी गुणधर्मात महत्त्वाचे कार्य आवळ्याचे होते ते आम्लपित्तावर. 

आवळा पावडर कोरडी जाळून त्याची राख करावी. ती गार झाल्यावर योग्य प्रमाणात मोरावळा किंवा मधासह घेतली तर उलटी, मळमळणे या तक्रारी कमी होतात. आवळ्यांना टोच्याने छीद्र पाडून कुकरमध्ये शिजवून किसावेत. आणि साखरेच्या पाकात घालावेत किंवा फोडी करून पाकात घालाव्यात. अशा प्रकारे केलेला मोरावळा पित्तावर उत्तम काम करतो. 

  •   अनेक जणांना शुगरचा त्रास असतो. त्यासाठी पथ्य आणि औषधे घ्यावी लागतातच. आवळा पावडर आणि हळद पावडर समभाग एकत्र करून ठेवावी. १/२ चमचा प्रमाणात रोज घ्यावी. प्रतिकारशक्ती वाढते. पचनास त्रास, जेवल्यानंतर जळजळ होणे या लक्षणांसाठी योग्य पथ्यपालन गरजेचे असते. पण औषधांच्या जोडीला आवळ काठी चघळली तर उपयोगी ठरते. आवळा सुपारीत जर ओवा, जिरे याचे प्रमाण असेल तर पाचक म्हणून काम करते. 
  •  केसांच्या तक्रारीमध्ये आवळा पावडर रोज १ चमचा केसांच्या मुळाशी पाण्यात कालवून लावावी. आवळ्यापासून केलेला च्यवनप्राश हे औषध तसे सुपरिचित आहेच. श्‍वसनाचे विकार, जुनाट व्याधी, विशेषतः क्षय, कोरडा खोकला यात च्यवनप्राश रोज १ चमचा जरूर घ्यावा. तो पाण्यासह घ्यावा. 
  •  आम्लपित्त, डायबेटिस इत्यादी विकारात आवळा उत्तम कार्य करत असला तरी त्या जोडीला लक्षणानुरूप औषधे पोटात घेणे आवश्‍यक असते. म्हणून स्वतःच्या मनाने मात्रा न ठरवता तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत. 
  • पथ्य 

  •  मसालेदार, तिखट, तेलकट, लोणचे, ठेचा, पापड, आंबट ताक, दही, शिळे पदार्थ पूर्ण बंद करावेत.  
  • - डॉ. विनिता कुलकर्णी, ९४२२३१०३७७

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT