Lumpy Skin Disease Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’मुळे जिल्ह्यात दोन जनावरांचा मृत्यू

गेल्या एक महिन्यापासून अनेक भागांत ‘लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील जुन्नर भागात या आजाराचे प्रमाण वाढत आहे.

टीम ॲग्रोवन

पुणे : गेल्या एक महिन्यापासून अनेक भागांत ‘लम्पी स्कीन या आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) वाढत आहे. जिल्ह्यातील जुन्नर भागात या आजाराचे प्रमाण (Animal Disease) वाढत आहे. या आजाराने आतापर्यंत दोन जनावरांचा मृत्यू (Two Animal Died Due To Lumpy Skin Disease) झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘‘उष्ण व आर्द्र हवामानात या रोगाचा जास्त प्रसार होतो. या रोगाची बाधा गाय व म्हैसवर्गातील सर्व वयोगटाच्या जनावरांना होते. लहान वासरांमध्ये रोगाची तीव्रता अधिक दिसून येते. या रोगाचा प्रसार साधारण १० ते २० टक्के जनावरांमध्ये होतो. देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. या रोगाचा प्रसार कीटक, डास चावणाऱ्या माश्‍या, गोचिड आदीमार्फत होतो. या आजाराच्या विषाणूंचा संसर्ग निरोगी व बाधित जनावरे यांच्यातील स्पर्शाने होतो. आजारामुळे काही वेळा गर्भपात होऊन प्रजनन क्षमता घटते,’’ असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शिवाजी विधाटे यांनी सांगितले.

राज्यात ९९७ जनावरांना लागण

राज्यातील जवळपास ९९७ जनावरांना ‘लम्पी स्कीन’ची लागण झाली आहे. ६२८ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत. उर्वरित जनावरांवर उपचार सुरू आहेत. लागण झालेल्यापैकी १३ जनावरांचा ‘लम्पी स्कीन’ या आजाराने आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यात जळगावमधील रावेर तालुक्यातील सर्वाधिक १० जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर नगर जिल्ह्यात एका जनावराचा मृत्यू झाला आहे. यात वाढ होताना दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले.

पुणे जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलत आहोत. ग्रामपंचायतींना गोठ्यात अँटी-वेक्टर फवारणीसारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी पैसे खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT