lumpy Skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’च्या भागांत स्वच्छ गोठ्याचे प्रशिक्षण द्या

‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी ‘आत्मा’द्वारे स्वच्छ गोठा विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन करावे,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

टीम ॲग्रोवन

पुणे ः ‘‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) असलेल्या ठिकाणी ‘आत्मा’द्वारे स्वच्छ गोठा (Clean Cowshed Mission) विषयावरील प्रशिक्षणाचे आयोजन करावे,’’ अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिल्या. कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (ता.१७) झाली. ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक पूनम खटावकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर आदी उपस्थित होते.

‘‘रेशीम विभागाच्या साहाय्याने जिल्ह्यात रेशीम उत्पादनवाढीसाठी तुती लागवडीचे क्षेत्र वाढवावे, या अनुषंगाने रेशीम उत्पादनाचे समूह तयार झालेल्या गावांमध्ये शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे. सोयाबीन पीकवाढीसाठी पाणी फाउंडेशनच्या मदतीने सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे आयोजन करावे. कृषी विभाग, साखर कारखाने व ‘आत्मा’तर्फे ऊस पाचट व्यवस्थापन प्रशिक्षणांचे आयोजन करावे,’’ अशा सूचना डॉ. देशमुख यांनी केल्या.

‘आत्मा’ने बारामती, इंदापूर तालुक्यांत उसाचे क्षेत्र जास्त असल्याने ऊस सुपरकेन नर्सरीविषयक प्रशिक्षण आयोजित करावे, डाळिंब पिकाच्या संरक्षणासाठी डाळिंब नेटचा वापर करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृतीसाठी प्रात्यक्षिके व प्रशिक्षणे घ्यावीत,’’ आदी सूचनाही त्यांनी केल्या.

या सभेमध्ये खटावकर यांनी ‘आत्मा’अंतर्गत खरीप हंगामामध्ये पूर्ण झालेले तसेच रब्बी हंगामातील नियोजित प्रशिक्षणे, प्रात्यक्षिके, शेतीशाळा आदींबाबत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Policy: महाराष्ट्राची जल-परंपरा आणि आधुनिक जलनीती

Pulse Beetle Identification,: कडधान्य साठवणुकीतील भुंगेऱ्याची ओळख

Organic Farming: सेंद्रिय शेती अन् पारंपरिक वाणांचा वारसा जपणाऱ्या ‘वैशालीताई’

Women Empowerment Story: महिला गटातून प्रक्रिया उद्योगाला चालना

Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT