Lumpy skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : ‘लम्पी स्कीन’ नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करा

जनावरांतील लम्पी स्कीन आजाराच्या नियंत्रणासाठी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व रोगावर तत्काळ नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Mahesh Gaikwad

जालना : जनावरांतील लम्पी स्कीन आजाराच्या नियंत्रणासाठी (Lumpy Skin Disease Control) शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे (Deadlines For Lumpy Control) काटेकोरपणे पालन करावे व रोगावर तत्काळ नियंत्रण मिळवावे, अशा सूचना जालना जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र आणि जिल्हा परिषदेचा पशू संवर्धन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षक यांच्यासाठी बुधवारी (ता.७) ‘‘जनावरांचा लम्पी स्कीन आजार, नियंत्रण व उपचार तसेच ब्रुसेल्ला आजार लसीकरण, रोग निदान व प्रयोगशाळा महत्त्व’’ या विषयावर आयोजित एकदिवसीय प्रशिक्षणात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील एकूण ६३ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने हे होते तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिगंबर कांबळे, सहायक आयुक्त डॉ. अमितकुमार दुबे, डॉ. प्रमोद कुमार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Farmer Scheme: पशुपालकांसाठी महत्त्वाची योजना; मिळणार शून्य टक्के व्याजावर ३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Irrigation Water Management Projects: सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्पातर्फे शेतकऱ्यांना तुषार संच वितरित

Fishermen Relief: मच्छीमारांना दिलासा; पाच जिल्ह्यांतील केंद्रांचे आधुनिकीकरण

Rural Water Crisis: चाळीस गावांची पाण्यासाठी वणवण

PMGSY: 'पंतप्रधान ग्राम सडक योजने'ला २०२८ पर्यंत मुदतवाढ, ८३,९७७ कोटींची तरतूद, ग्रामीण वाड्या- वस्त्या शेती बाजारपेठांशी जोडणार

SCROLL FOR NEXT