Lumpy skin Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : सांगली जिल्ह्यात सहा जनावरांना ‘लम्पी’

सांगली ः जिल्ह्यातील ४ गाई आणि २ वासरू, अशा ६ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली आहे. वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि चिकुर्डे गावात प्रादुर्भाव झाला आहे.

टीम ॲग्रोवन

सांगली ः जिल्ह्यातील ४ गाई आणि २ वासरू, अशा ६ जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण (Lumpy Skin Infection To Animal) झाली आहे. वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि चिकुर्डे गावात प्रादुर्भाव (Lumpy Skin Disease Outbreak) झाला आहे. साताऱ्यातून शर्यत करून परतलेल्या बैलापासून लागण झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन विभागाच्या (Department Of Animal Husbandry) वतीने व्यक्त करण्यात आला. जिल्ह्यात लम्पी स्कीन शिरकाव केल्याने जनावरांची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यांपर्यंत एकाही जनावरांना लम्पी स्कीन आजाराची लागण झाली नव्हती; मात्र नुकतेच वाळवा तालुक्यातील शेखरवाडीत ३ गाई आणि २ वासरू आणि चिकुर्डेत १ गाय अशा एकूण ६ जनावरांना या आजाराची बाधा झाल्याचे दिसून येत आहे. साताऱ्यामध्ये शर्यत करून आलेल्या एका बैलापासून याचा प्रसार झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. प्रादुर्भाव झालेल्या जनावरांचे विलगीकरण करण्यात आले आहे. गावात औषध फवारणी करण्यात आली आहे. प्रादुर्भाव झालेल्या गावापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील दोन हजार जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे.

पुणे आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे एक हजार ५०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात या आजाराने शिरकाव केल्याने सुमारे साडे तेरा लाख जनावरांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग दक्ष झाला आहे. शासनाकडून १० हजार लसी उपलब्ध होणार आहेत. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव होईल त्या परिसरात जनावरांसाठी या लसीचा उपयोग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी फवारणी करण्याचे नियोजन केले आहे.

लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. एक लाख डोसची मागणी आम्ही केली आहे. ज्या भागामध्ये हा प्रादुर्भाव आढळला आहे, त्या ठिकाणी दोन हजार जनावरांना लसीकरण केले आहे.
डॉ. एस. एस. बेडक्याळे, उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT