Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease Agrowon
ॲनिमल केअर

Lumpy Skin : चार दुभत्या जनावरांना लम्पी स्कीनची बाधा

टीम ॲग्रोवन

सोलापूर ः शिंगोर्णी (ता.माळशिरस) येथील तीन जनावरांना आधीच लम्पीस्कीनचा संसर्ग (lumpy Skin Infection To Livestock) झाला होता. त्यानंतर आता आणखी चार दुभत्या जनावरांना लम्पीस्कीनची बाधा (Lumpy Skin Infection To Milch Animal) झाली आहे. दोनच दिवसात गावातील सात जनावरांना या रोगाची लक्षणे (Lumpy Skin Disease Symptoms) दिसून आल्याने शेतकऱ्यांत चिंता आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम (Lumpy Skin Vaccination Drive By Department Of Animal Husbandry) वेगाने सुरु केली आहे. तसेच प्रादुर्भाव वाढत असल्याने सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित झाला आहे. गाय-म्हैस-वर्गाच्या प्राण्यांची वाहतूक, आठवडी बाजार, जत्रांमध्ये प्रदर्शन भरवण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे.

शिंगोर्णी (ता.माळशिरस) येथे दोनच दिवसापूर्वी दोन गाई आणि एका म्हशीला लम्पी स्कीनची बाधा झाल्यानंतर उपचार सुरु कऱण्यात आले होते. तसेच या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर या जनावरांना ठेवण्याची व्यवस्था केली होती. गावातील अडीच हजाराहून अधिक जनावरांचे लसीकरणही वेगात सुरु आहे. त्याशिवाय अन्य नजीकच्या गावातही त्यादृष्टीने काम सुरु आहे. पण तोवरच आणखी चार जनावरांमध्ये ही लक्षणे आढळून आली आहेत. पशुसंवर्धन विभागाने लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव आटोक्यात असून, शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही, असे आवाहन केले आहे. पण शेतकऱ्यांना जनावरांच्या आरोग्याची चिंता वाटू लागली आहे. त्यातच सोलापूरच्या शेजारील पुणे, कोल्हापूर जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. त्यातच काही जनावरेही दगावली आहेत. मुख्यतः हा रोग संसर्गजन्य असल्याने या चिंतेत आणखीनच भर पडली आहे.

जिल्हा प्रशासनाने घेतलेले निर्णय ः

-सोलापूर जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित.

-गुरे, म्हशी यांची ज्या ठिकाणी ते पाळले (ठेवले) जातात, त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने-आण करण्यास मनाई करण्यात आली आहे.

-बाधित असलेली कोणतीही जिवंत किंवा मृत गुरे व म्हशी, गोजातीय प्रजातींच्या कोणत्याही बाधित झालेल्या प्राण्यांच्या संपर्कात आलेली कोणत्याही प्रकारची वैरण, प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी असलेले गवत किंवा अन्य साहित्य नियंत्रित क्षेत्राच्या बाहेर नेण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

-कोणताही प्राणी बाजार भरवणे, प्राण्यांच्या शर्यती, प्राण्यांची जत्रा, प्राण्यांचे प्रदर्शन भरवता येणार नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT