animals suffer from milk fever after calving Agrowon
कृषी पूरक

विल्यानंतर जनावरांना का होतो मिल्क फिव्हर ?

जनावर गाभण असताना शेवटच्या टप्प्यात अधिक कॅल्शियमयुक्त आहार दिल्यास, विल्यानंतर जनावरे मिल्क फिव्हर या आजाराला बळी पडतात.

Roshani Gole

जनावर गाभण (pregnant cow) असताना शेवटच्या टप्प्यात अधिक कॅल्शियमयुक्त (calcium) आहार दिल्यास, विल्यानंतर जनावरे मिल्क फिव्हर (milk fever) या आजाराला बळी पडतात. मिल्क फिव्हरला दुग्धज्वर किंवा दुधाचा ताप असेही म्हंटले जाते. अधिक दुधाचे उत्पादन देणाऱ्या जनावरांमध्ये विल्यानंतर ४८ ते ७२ तासांपर्यंत या आजाराची लक्षणे दिसून येतात.

आजाराची कारणे-

- या आजाराचे मुख्य कारण जनावरांच्या रक्तातील कॅल्शियमचे प्रमाण कमी असणे होय.

- संकरीत जनावरांमध्ये या आजाराची बाधा जास्त दिसून येते. आणि प्रमाण ५ ते ७ टक्क्यापर्यंत असू शकते.

- ५ ते १० वर्षाच्या वयातील आणि तिसऱ्या ते सातव्या वेतातील गायीमध्ये हा आजार प्रामुख्याने दिसून येतो.

- विल्यानंतर गाभण जनावरांच्या शरीरातील कॅल्शियम चिक निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला गेल्याने शरीरात कॅल्शियमची उणीव निर्माण होते.

लक्षणे -

दुग्धज्वराम्ध्ये सुप्त आणि दृश्य अशा दोन प्रकारची लक्षणे दिसून येतात. आजारी जनावर तीन टप्प्यात लक्षणे दाखविते

पहिल्या टप्पा- जनावर थरथर कापते, उभे राहण्याचा प्रयत्न करता जनावरांचा तोल जातो, दात खाणे, करकर वाजविणे. हा काळ लहान असल्याने पशुपालकाच्या लक्षात येत नाही.

दुसरा टप्पा- या टप्प्यात जनावर सुस्त, पोटाकडे मान वळवून बसून राहते. नाकपुड्या कोरड्या पडतात. शरीराचे तापमान कमी होते. डोळ्याच्या बाहुल्या स्थिर व मोठ्या होतात. ओटी पोटाची हालचाल कमी झाल्याने पोट फुगते, गुर्द्वार ढिले पडते. शेवटच्या टप्प्यातील गाभण जनावरांना कॅल्शियमची कमतरता भासून मायांग बाहेर येते.

तिसरा टप्पा – हा टप्पा तीव्र असून शेवटच्या टप्प्यात जनावरे आडवी पडून श्वासोच्छ्वास मंदावतो. शरीराचे तापमान अजून कमी होते. तात्काळ उपचार न केल्यास असे जनावर बेशुद्ध पडून काही वेळात दगावू शकते.

प्रतिबंधात्मक उपाय –

जनावर विल्यानंतर त्यांना मिल्क फिव्हर आजार होऊ नये म्हणून विण्याच्या आधी आणि विल्यानंतर त्यांना संतुलित आहाराचा पुरवठा करावा. गाभण काळात खुराक देताना तो अधिक प्रमाणातही देऊ नये. सोबतच शरीरात कमतरता निर्माण होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. या अवस्थेतील जनावरांना ५० ग्रॅम खनिज मिश्रण दररोज द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

Orange Orchard Damage: उष्णता, पूर्वमोसमी पावसाचा संत्रा बागांना मोठा फटका

Hingoli Crop Loan Disbursement: हिंगोलीत पीककर्ज वाटप केवळ १०.०३ टक्के

Fort Conservation: गड संवर्धनासाठी एकवटले मावळे

Mahabeej Seed Sales Stalled: पावसाअभावी ‘महाबीज’च्या बियाण्यांची विक्री ठप्प

SCROLL FOR NEXT