Toned And Double Toned Milk Agrowon
कृषी पूरक

टोन्ड, डबल टोन्ड दूध म्हणजे काय?

प्रमाणित दुग्धजन्य घटकापासून बनवलेले टोन्डं किंवा डबल टोन्ड दूध म्हणजे फक्त दुग्धजन्य घटक मिसळून किंवा काढून तयार होणारे दूध होय.

Team Agrowon

गाय व म्हशीचे दूध म्हणजे त्यांच्या कासेतून मिळाणारे दूध अपेक्षीत असते, त्यात कोणताही कृत्रीम बदल नसावा. प्रमाणित दुग्धजन्य घटकापासून बनवलेले टोन्डं किंवा डबल टोन्ड दूध म्हणजे फक्त दुग्धजन्य घटक मिसळून किंवा काढून तयार होणारे दूध होय. येथे दुग्धजन्य घटकाशिवाय इतर कोणताही बाह्य घटक निषिद्ध असतो. स्कीम मिल्क म्हणजे प्राण्यांच्या दुधातील फॅट काढलेले फॅट विरहित दूध अपेक्षित आहे.

प्रमाणित दूध
या प्रकारच्या दुधात नियमाप्रमाणे अपेक्षित फॅट (स्निग्ध पदार्थ) व फॅट विरहित (स्निग्ध विरहित) घनपदार्थ प्रमाणित केले जातात. यामध्ये ४.५ टक्के फॅट तर ८.५ टक्के फॅट विरहित घनपदार्थ असावे. या प्रक्रियेमध्ये ठरवून दिलेल्या मानकापेक्षा जास्तीचे घटक कमी करण्याची व कमी पडणारे घटक त्यात मिसळण्याची सवलत आहे. मात्र असे करत असताना फक्त दुग्धजन्य घटकच वापरणे आवश्यक आहे. इतर कोणतेही रासायनिक घटक नव्हे.

दुग्धजन्य घटकापासून बनवलेले दूध
या प्रकारचे दूध, दुधापासून निर्मित तूप व स्कीम मिल्क पावडर पिण्यायोग्य पाण्यात मिसळून तयार केले जाते. असे करताना त्यातील फॅट ३ टक्के व फॅट विरहित दुग्धजन्य पदार्थ ८.५ टक्के हवेत.

टोन्ड दूध
दूध नियमानुसार आवश्यक ३ टक्के फॅट व ८.५ टक्के फॅट विरहित घन पदार्थाचे प्रमाण राखताना म्हशीच्या दुधात बाहेरून पाणी व स्कीम मिल्क पावडर मिसळून टोन्ड दूध तयार केले जाते.

डबल टोन्ड दूध
या प्रकारचे दूध टोन्ड दुध करताना जी प्रक्रिया केली जाते ती तशीच वापरतात. मात्र डबल टोन्ड दुधातील फॅट व इतर घनपदार्थांचे प्रमाण अनुक्रमे १.५ टक्के व ९ टक्के अपेक्षित असते.
वरील सर्व दुधाकरिता दूध प्रक्रिया केंद्रावर करायच्या सर्व प्रक्रिया म्हणजे होमोजीनायझेशन, पाश्चरीकरण, चीलिंग, पॅकिंग, वाहतूक प्रक्रिया नेहमीप्रमाणेच करायच्या असतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT