fishery in rice field  Agrowon
कृषी पूरक

भातशेतीमध्ये मत्स्यशेती कशी करावी?

- भात शेती करत असताना, शेतातील पाण्याच्या पातळीचा विचार करून त्यात मत्स्यशेती केल्यास, चांगला फायदा दिसून येतो.

Team Agrowon

भातामध्ये मत्स्यशेती (fish farming) करण्याचे काही प्रकार आंध्रप्रदेशमधील काही शेतकरी करताना दिसतात. यामध्ये भात पिकाची (rice farming) शेती करत असताना, शेतातील पाण्याच्या पातळीचा विचार करून त्यात मत्स्यशेती केल्यास, चांगला फायदा दिसून येतो. योग्य व्यवस्थापन केल्यास तीन ते साडेतीन महिन्याच्या कालावधीनंतर ५०० ते ७०० ग्रॅम वजनाच्या माशांचे उत्पादन मिळू शकते.

एक हेक्टर क्षेत्रफळावर भाताची शेती करत असताना, चारही बाजूंनी सहा मीटर अंतर सोडावे. या जागेमध्ये मत्स्यशेतीसाठी जागा उपलब्ध होते. भात शेतीमध्ये मत्स्यपालन करण्याआधी शेताभोवती बांधबंदिस्ती मजबूत असली पाहिजे. साधारणपणे बांध दीड ते दोन फूट रुंदीचे आणि साधारणपणे दोन फूट उंचीचे असावेत. या बांधावर तीन फूट उंचीची जाळी लावून घ्यावी, ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे मासे वाहून जाणार नाहीत.

भातशेतीमध्ये मत्स्यसंवर्धन करण्यासाठी प्रामुख्याने आपल्या भागासाठी रोहू, कटला, मृगळ माशांचा वापर करू शकतो. यांचे प्रमाण अनुक्रमे २५, ३० आणि ४५ टक्के असे ठेवावे. यांची घनता पाच ते सहा प्रति हेक्टर अशी ठेवावी.

भात पिकाच्या उत्पादनासोबत मत्स्यशेती केल्याने अतिरिक्त उत्पादन मिळते. अन्नसुरक्षेच्या दृष्टीकोनातून ते तंत्र अत्यंत उपयुक्त आहे. भात पिकात मत्स्यशेती करयाची असल्यास, भाताच्या लवकर येणाऱ्या वाणांची पेरणी रोपवाटिकेत करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gokul Election Result: 'गोकुळ'मध्ये सतेज पाटील यांची 'शिट्टी' वाजली, मुश्रीफांनी निकाल स्वीकारला

Mosambi Farming : पोपटांच्या थव्यांचा मोसंबी बागांवर डल्ला!

Water Conservation : दहा तालुक्यांत ४०० वनराई बंधारे

Sugarcane FRP Price : अहिल्यानगर जिल्ह्यात ऊसदर जाहीर करा

Crop Damage Compensation: पीक नुकसानभरपाईसाठी ई-केवायसीची अट रद्द करा; आमदार दिलीप बनकर यांची मागणी

SCROLL FOR NEXT