शेतमाल तारण कर्ज योजना agrowon
कृषी पूरक

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना ?

धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही.

Team Agrowon

धान्याच्या काढणीनंतर एकाच वेळी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणल्यामुळे शेतमालास योग्य भाव मिळत नाही. गोदाम व धान्य साठवणुकीच्या अपुऱ्या सुविधा व शेतकऱ्यांच्या रोजच्या गरजा भागविण्यासाठी एकाच वेळी शेतमाल (farm produce) मोठ्या प्रमाणात बाजारात येत असतो. त्यामुळे शेतमालाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असते.

हा शेतमाल साठवणूक करुन काही कालावधीनंतर बाजारपेठेत विक्रीसाठी आणल्यास त्या शेतमालास जादा बाजार भाव मिळू शकतो. तेव्हा शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळावा या दृष्टीकोनातून कृषि पणन मंडळ सन १९९०-९१ पासून शेतमाल तारण कर्ज योजना राबवित आहे.

या योजनेमध्ये तूर, मूग, उडीद, सोयाबीन, सुर्यफूल, चना, भात, करडई, ज्वारी, बाजरी, मका, गहू, काजू बी, बेदाणा व हळद या शेतमालाचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बाजार समितीच्या गोदामात तारण ठेवलेल्या शेतमालाच्या एकूण किंमतीच्या पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत रक्कम सहा महिने कालावधीसाठी सहा टक्के व्याजदराने तारण कर्ज म्हणून देण्यात येते.

ही योजना बाजार समित्यांमार्फत राबविली जात असून सहा महिन्यांचे आत तारण कर्जाची परतफेड करणाऱ्या बाजार समित्यांना तीन टक्के व्याजाची सवलत दिली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; मक्यात काहिशी सुधारणा,गव्हाचे भाव स्थिरावले तर कैरीला काकडीला उठाव

Bajari Awak: खानदेशात बाजरीची आवक सुरू; दर मात्र स्थिर

Pani Tanchai: नंदुरबारात पाणी टंचाईची शक्यता

Maharashtra Rain Alert : दोन दिवसांत पावसाला पोषक हवामान; राज्यातील अनेक भागात तापमान वाढल्याने उन्हाचा चटकाही वाढला

Agriculture Growth: भारतातील शेती क्षेत्रात आर्थिक वाढीस गती देण्याची मोठी क्षमता- निती आयोग

SCROLL FOR NEXT