Kadaknath poultry  Agrowon
कृषी पूरक

Kadaknath Poultry : कडकनाथ कोंबडीची वैशिष्ट्ये काय आहेत?

कडकनाथ कोंबडी ही प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ व धार जिल्ह्यात आढळते. येथील आदिवासी लोकांनी पाळलेली ही एक देशी कोंबडीची जात आहे.

Team Agrowon

कडकनाथ कोंबडी (Kadaknath Poultry) ही प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्यातील झाबुआ व धार जिल्ह्यात आढळते. येथील आदिवासी लोकांनी पाळलेली ही एक देशी कोंबडीची जात आहे. मध्य प्रदेशातील मूळच्या ठिकाणी वातावरणाच्या गरजेनुसार कडकनाथ कोंबडीची उत्पत्ती झाली. कडकनाथ कोंबडीला आदिवासी लोक कालामासी (Kalamasi) असे सुद्धा म्हणतात. कडकनाथ कोंबडीच्या पेन्सिल, जेट ब्लॅक आणि गोल्डन या उपजाती आढळतात. कडकनाथ कोंबडी ही तिच्या विशिष्ट गुणांमुळे आदिवासी लोकांमध्ये प्रसिद्ध आहे.

कडकनाथ कोंबडीच्या काळसर मांसामुळे तिची ओळख कुक्कुटपालन जगतात वेगळी आहे.  

कडकनाथ कोंबडीचा काळसर रंग हा तिच्यामध्ये असलेल्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे आहे. या कोंबडीमध्ये मेलॅनिनचे प्रमाण अगदी जास्त असल्यामुळे तिचा रंग, त्वचा आणि मांससुद्धा काळसर आहे. काही प्रमाणात शरीरातील अवयवसुद्धा काळसर आहेत.

या कोंबड्या इतर देशी कोंबड्याप्रमाणे फिकट तपकिरी रंगाचे छोट्या आकाराची अंडी घालतात. अंडी व मांस खाल्ल्याने शरीराला फायदाच होतो.

वैशिष्ट्ये 

या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.

मुक्त संचार पद्धतीत या कोंबडीची हळुवार वाढ होते. चांगल्या प्रतीचे खाद्य दिल्यावर तीन ते साडेतीन महिन्यांत साधारण एक किलो वजन होते.

प्रतिकारशक्ती चांगली आहे.

मास चविष्ट असून, रंग काळसर आहे.

प्रति वर्ष ८० ते १०० अंडी देते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शिवसैनिक खचला नाही, पेटून उठलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Women SHGs: महिला बचत गटांना २५ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचे उद्दिष्ट

Below Average Rainfall: परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील ७३ मंडलांत सरासरीहून कमी पाऊस

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमधील ३३ गावांची होणार फेरतपासणी

Water Conservation: अबिटघरमध्ये जलसंधारणाला गती

SCROLL FOR NEXT