What are the characteristics of Mandgyal sheep? 
कृषी पूरक

मडग्याळ मेंढीची वैशिष्ट्ये

महाराष्ट्रात दख्खनी , मडग्याळ या जातीच्या मेंढ्या प्रमुख्याने आढळून येतात. दख्खनी मेंढ्या मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. मडग्याळ मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे.

टीम अॅग्रोवन

महाराष्ट्रात दख्खनी , मडग्याळ या जातीच्या मेंढ्या प्रमुख्याने आढळून येतात. दख्खनी मेंढ्या मांस उत्पादनासाठी चांगल्या असतात. मडग्याळ मेंढ्यांचा रंग प्रामुख्याने पांढरा त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे.

सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यात मडग्याळ (mandgyal) या गावात आणि सभोवतालच्या कवठेमहांकाळ (kavthemankal), रांजणी (ranjani) या भागात या मेंढ्या आढळून येतात. मडग्याळ या गावावरून या मेंढ्यांना हे नाव दिले गेले. हेही पाहा-  कुर्बानीकरता बोकड पालन

या मेंढ्या दख्खनी (dakhkhani) मेंढ्यांपेक्षा उंच, लांब, बाकदार नाक, लांब मानेच्या असतात.  यांच्या शरीराचा रंग पांढरा असून त्यावर तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. या जातीच्या मेंढ्यांची वाढ चांगली असून, बरेचसे पशुपालक या जातीच्या नराचा पैदाशीसाठी वापर करताना दिसतात.

या मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन हे ३ ते ३.५ किलो असते. तर तीन महिने वय असताना त्याचे वजन १८ ते २२ किलो तर , सहा महिन्याचे झाल्यावर २५ ते ३० किलोपर्यंत जाते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलोपर्यंत जाते. वजन वाढीचा दर प्रति दिवस १७० ते २४० ग्रॅम इतका असतो. यांच्या नर आणि मादींना शिंगे येत नाहीत. या मेंढ्यांपासून लोकर आणि दूध ही कमी मिळत असते. या मेंढ्यांच्या शरीरावर लोकर फार कमी प्रमाणात असते.   या मेंढ्याच्या शरीराची वाढ जोमाने होते. मेंढीच्या कोकराचे जन्मतः वजन ३ ते ५  किलो असते. तीन महिने वयाच्या वेळचे वजन २२ किलो होते. पूर्ण वाढ झालेल्या मेंढीचे वजन ४५ ते ५० किलो इतके असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT