Vaccination In Sheep and Goat 
कृषी पूरक

शेळ्या-मेंढ्याचे लसीकरण कधी करावे?

कोणताही आजार होण्याआधी त्या जनावरांचे लसीकरण करणे खुप महत्त्वाचं असतं. आजाराची बाधा झाल्यानंतर लसीकरण केल्यास फारसा फायदा होत नाही.

रोशनी गोळे

कोणताही आजार होण्याआधी त्या जनावरांचे लसीकरण करणे खुप महत्त्वाचं असतं. आजाराची बाधा झाल्यानंतर लसीकरण केल्यास फारसा फायदा होत नाही. जनावरांना वयानुसार आणि वजनानुसार लसीकरण करण गरजेचं आहे. एकाच वेळी गोठ्यातील सर्व जनावरांना लसीकरण केल्यास जास्त फायदा दिसून येतो.

लसीकरण करताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावे. लसीकरण (Vaccination) करताना वापरली जाणारी लस योग्य मात्रेत आणि तिची साठवणूक आणि वाहतूक योग्य पुरवठा साखळीतून झालेली असावी. लस नेहमी निरोगी शेळ्यांनाच टोचावी. लस टोचलेल्या ठिकाणी व्यवस्थित चोळावे म्हणजे त्या ठिकाणी गाठ येणार नाही. लसीकरण करण्याअगोदर ८-१० दिवस अगोदर शेळ्यांना जंतनाशक (Deworming) पाजावे; जेणेकरून लसीचा परिणाम चांगला होण्यास मदत होते.

  1. आंत्रविषार म्हणजे एन्टरोटोक्सेमिया रोगाविरुद्ध ३ महिन्यावरील सर्व करडांना पहिला डोस द्यावा. पहिल्या डोस नंतर १५ दिवसांनी बुस्टर डोस देणे गरजेचे असते. पुढे दर सहा महिन्यांच्या अंतरानी लस टोचावी.

  1. घटसर्प रोगाविरुद्ध करडांना तीन महिने वयानंतर आणि नंतर वर्षातून दोनदा सहा महिन्याच्या अंतराने लसीकरण करावे.

  1. संसर्गिक आंत्रसंस्था दाह म्हणजे पेस्टीस डे पेटी रूमिननट्स रोगाविरुद्ध ३ महिन्याच्या वरील सर्व करडांना आणि नंतर तीन वर्षातून एकदा लस द्यावी.

  1. शेळ्या-मेंढ्याना लाळ्या खुरकुतची लस तीन महिने वयानंतर सप्टेंबर आणि मार्च मध्ये द्यावी. लाळ्या खुरकूत रोगाविरुद्ध लस हि सहा महिन्याच्या अंतराने वर्षातून दोनदा द्यावी.

  1. फऱ्या आणि थायलेरीयासिस विरुद्ध तीन महिन्याच्या वरील वासरास वर्षातून एकदा जून आणि मे मध्ये लस द्यावी.

  1. ब्रुसेलोसिस आयुष्यात एकदाच तीन महिन्याच्या वरील मादी करडांना द्यावी.  

  1. धनुर्वाताविरुद्ध लस तीन महिन्याच्या वरील वासरास द्यावी, नंतर वर्षातून एकदा लसीकरण करावे.

वेळच्या वेळी लसीकरण न केल्यास रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास गोठ्यातील फक्त एक शेळी, करडू अथवा बोकड दगावल्यास कमीत कमी ४ ते ५ हजार रुपयांचे नुकसान होऊ शकते. म्हणून वेळच्या वेळी लसीकरण करत जा. मात्र लसीकरण पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच करावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT