Fish Farming Agrowon
कृषी पूरक

Fish Farming : मच्छीमारांच्या जाळ्यात तारली सापडेना

उत्पादन घटले, बांगडा वाढला; निसर्ग साखळीवर परिणाम

टीम ॲग्रोवन

रत्नागिरी ः तारलीचे उत्पादन (Tarli Production) कमी झाले, की आपसूकच समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या (Fisherman) जाळ्यात बांगडा (Bangada Fish) वाढतो. मागील तीन वर्षांत तारलीचे प्रमाण कमी झाल्याचे मत्स्य विभागाकडील (Department Of Fisheries) आकडेवारीतून दिसत आहे. या दरम्यान बांगडा अधिक प्रमाणात मिळाला आहे. निसर्ग साखळीवर परिणाम होण्यासह छोटी मासळी मोठ्या प्रमाणात मारली जात असल्याने ही परिस्थिती ओढवली असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

बांगड्याप्रमाणे तारलीलाही प्रचंड मागणी आहे. हा मासा सर्वाधिक केरळ किनारपट्टीवर आढळतो. त्याचबरोबर काही प्रमाणात तो रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरही थव्याने सापडतो. गेल्या पाच वर्षांतील आकडेवारी पाहिली तर मागील तीन वर्षांत त्याचे उत्पादन ५० टक्केने घटले आहे. हा मासा थव्याने राहतो. तारलीचे मुख्य खाद्य म्हणजे वनस्पती प्लवंग तर बांगड्याचे मुख्य खाद्य प्राणी प्लवंग आहे. प्राणी प्लवंग वाढते तेव्हा वनस्पती प्लवंग कमी होते आणि वनस्पती प्लवंग वाढते तेव्हा प्राणी प्लवंग कमी होते.

त्याचा परिणाम तारली आणि बांगड्याच्या उत्पादनावर होतो. लहान आकाराचे मासे जाळ्यात सापडल्यामुळे प्रजोत्पादन कमी होऊ लागले आहे. स्थलांतरावेळी मागील तीन वर्षांत केरळकडून तारली मासा गोवा, कोकणकडे आलेला नाही. रत्नागिरी जिल्ह्यात ९४३ टन मासळी २०१८-१९ ला सापडली होती. त्यानंतर २०२०-२१ ला ३१ हजार १११ टन मासळी सापडली. हा मासा तेल काढण्यासाठी वापरला जातो.

...असा असतो तारली मासा

तारलीला इंग्रजीत ‘ऑइल सार्डीन’ म्हणतात. त्याचे शरीर लांबट आणि दोन्ही टोकांकडे निमुळते व दोन्ही बाजूंनी चपटे असते. पाठीचा रंग काळपट चंदेरी असून त्यात सोनेरी चमक दिसते. हा मासा २०-२३ सेंमी लांब व २०० ग्रॅमपर्यंत वाढतो. पकडले गेलेले मासे १२-१५ सेंमी लांब असतात.

गेल्या तीन वर्षांतील आकडेवारी

मासा---२०१६-१७---२०१७-१८---२०१८-१९---२०१९-२०---२०२०-२१

तारली (टन)---७,१८१---९,०६९---९४३---२,५१०---३,१११

बांगडा (टन)---२५,२१५---२२,८६३---१६,७५२---६,१२७---११,१२६

तारली हा स्थलांतर करणारा मासा आहे. जिथे सुरक्षित वातावरण आहे तिथेच तो जातो. समुद्राची स्थिती अनुकूल नसेल अशा ठिकाणी तो जातच नाही. या माशापासून तेल काढले जाते.
ना. वि. भादुले, सहायक आयुक्त मत्स्य विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gharkul Yojana : ग्रामीण भागातील घरकुलांना शहरीप्रमाणे निधी द्या

Women Entrepreneur : महिला उद्योजकांनी विक्री व्यवस्था उभारणे आवश्यक ः आवटे

Soybean Procurement : सोयाबीन खरेदीला धाराशिवमध्ये वेग

Mahayuti Press Conference : महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक विजय असून लाडक्या बहिणींनी अंडरकरंट दिला; महायुतीच्या पत्रकार परिषदेतून शिंदे, फडणवीस, अजित पवार यांची मविआवर टीका

Onion Cultivation : एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले कांदा लागवड क्षेत्र

SCROLL FOR NEXT