external parasites  
कृषी पूरक

गोचीड निर्मुलनासाठी काय करावे?

आपल्याला जनावरांच्या अंगावर जे गोचीड दिसते ते फक्त पाच टक्के गोचीड असते. उरलेले ९५% गोचीड आणि त्यांची अंडी हे गोठ्यातील भिंतीतील भेगांमध्ये, गोठ्यातील जमिनीत,गव्हाणीच्या भेंगामध्ये किंवा कोणत्याही आधाराच्या खाली लपून बसलेले बसतात.

टीम अॅग्रोवन

आपल्याला जनावरांच्या अंगावर जे गोचीड दिसते ते फक्त पाच टक्के गोचीड असते. उरलेले  ९५% गोचीड आणि त्यांची अंडी हे गोठ्यातील भिंतीतील भेगांमध्ये, गोठ्यातील जमिनीत,गव्हाणीच्या भेंगामध्ये किंवा कोणत्याही आधाराच्या खाली लपून बसलेले बसतात. गोचीडांचे जीवनचक्र-  गोचीड हा रक्तावर (blood) उपजीविका करणारा परजीवी (parasite) आहे. त्याचे जीवनचक्र साधारणपणे तीन वर्षांचे असते. सहा पायांची डिंभ अवस्था फार लहान असते. तीन आठवड्यातच गोचीड तरुण अवस्थेत जाते. ही अवस्था अधिक काळ टिकते. यात त्याला आठ पाय असतात. गोचीड जमिनीवर पडते व जवळील भेगांमध्ये (भिंत, जमीन) शिरतो आणि जवळपास तीन ते पाच हजार अंडी (eggs) घालते.

हेही पाहा - जनावरांमधील गोचीड नियंत्रण आणि औषधोपचार

अंड्यातून निघणारे सूक्ष्म गोचीड जनावरांच्या अंगावर चिकटून रक्त पितात व खाली पडतात. खाली पडल्यानंतर ते कात टाकतात. अशाच प्रकारे दोन ते तीन वेळा होते व नंतर मादी गोचीड परत अंडी घालते. गोचीड प्रतिबंधात्मक उपाय  

  • जनावरांचा गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
  • दर महिन्याला गोठ्यात चुना (lime) मारून घ्यावा.
  • वर्षातून दोनदा गोठ्यातील भेगा, कपारींमध्ये गोचिडांची अंडी फ्लेमगनच्या किंवा टेंभ्याच्या साह्याने जाळून घ्याव्यात.
  • लाकडी गोठा असल्यास लोखंडी पत्र्याच्या सहाय्याने खरडपट्टी करून अंडी व गोचीड गोठ्याच्या बाहेर जाळून टाकावीत.
  • गोठ्यातील गोचीडांच्या प्रजननाच्या भेगा, फटी, छिद्रे,बिळे अशा जागांचा नायनाट करावा.
  • उंदीर-घूस यांसारख्या उपद्रवी प्राण्यांचा बंदोबस्त करावा.
  • जनावरांचा नियमित खरारा करावा.
  • पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने जनावरांचे गोचीड निर्मूलन करावे.
  • ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Pomegranate Theft: केळेवाडीत डाळिंब बागेवर चोरट्यांचा डल्ला

    Shaktipeeth Highway Project: वाकाव, उंदरगावात ‘शक्तिपीठ’ जीपीएस मोजणीचे काम सुरू

    Pandharpur Vitthal Temple: विठ्ठल दर्शन बारीसाठी ‘पाॅली कार्बोनेट’

    White Grub Management: अडीच हजार शेतकऱ्यांनी उभारले प्रकाश सापळे

    Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी बंधनकारक

    SCROLL FOR NEXT