Milk Products Agrowon
कृषी पूरक

दुधाच्या विक्रीदरात आणखी वाढ नाहीः क्रिसिल

प्रमुख दूध उत्पादक (Milk Producing States) राज्यांत पशुंना आजाराची लागण आणि पशुखाद्याचे (Animal Feed) दर वाढल्यामुळे संघटित संस्थाकडील दूध संकलन घटले होते.

Team Agrowon

दुधाच्या विक्री दरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता नाही. वाढत्या उत्पादनखर्चामुळे (Production Cost) संघटित क्षेत्रातील दूध व्यवसायातील नफ्याचे प्रमाण रोडावले होते. नुकत्याच केलेल्या विक्री दरातील वाढीमुळे ही घट रोखण्यास मदत होईल. दूध संकलन वाढल्यामुळे आणि निविष्ठांच्या किंमती नरमल्यामुळे आता नफ्याचे प्रमाण सुधारले आहे. त्यामुळे आता दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता नाही, असे क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे.

अमूल आणि मदर डेअरीने १७ ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारातील किरकोळ दूध विक्रीचा दर २ रुपयांनी वाढवला आहे.

क्रिसिल रेटींग्जचे संचालक आनंद कुलकर्णी म्हणाले, ``प्रमुख दूध उत्पादक राज्यांत पशुंना आजाराची लागण आणि पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे संघटित संस्थाकडील दूध संकलन घटले होते. त्यामुळे मागच्या सहा महिन्यांत दूध खरेदी दरात ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली. त्यातच इंधन दरवाढीमुळे पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चातही वाढ झाली.``

परंतु यापुढे दुधाच्या किरकोळ विक्री दरात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. कारण दुध संकलनात होत असलेली अपेक्षित वाढ आणि निविष्ठांच्या नरमलेल्या किंमती यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात दूध कंपन्यांच्या नफावाढीला बळ मिळेल, असे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

मागच्या वर्षी कृत्रिम रेतन, पशु पालन आणि लसीकरणाच्या वेळापत्रकात अडसर निर्माण झाल्याने दुधाचा पुरवठा विस्कळीत झाला. मात्र आता या गोष्टी मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे डिसेंबर ते मार्चचा पहिला पंधरवडा या काळात दूध पुरवठ्यात सुधारणा होईल, असे क्रिसिलने म्हटले आहे.

दुधाची मागणी कायम राहणार आहे. दुधासोबतच तूप, लोणी, चीज, दही, आईसक्रीम या दुग्धजन्य उत्पादनांनाही चांगली मागणी आहे. दुधाच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या (value-added products) किमती तुलनेने स्थिर आहेत. त्यांच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण ७ ते ९ टक्के असल्याचे क्रिसिलने नमूद केले आहे.

कोविड महामारीनंतरच्या (Post Pandemic) काळात हॉटेल, रेस्टोरंट्स आणि कॅफे (HoReCa) सेगमेंटकडून दुधाच्या मूल्यवर्धित उत्पादनांना चांगली मागणी आहे. चालू आर्थिक वर्षात या उत्पादनांच्या विक्रीत ६ ते ६.५ टक्के वाढ झाली असून त्यामुळे संघटित दूध क्षेत्राच्या उत्पन्नात १३ ते १४ टक्क्यांची वाढ होणार असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. स्थानिक बाजारातून दूध व दुग्धजन्य उत्पादनांची मागणी वाढल्याने या संस्थांच्या खेळत्या भांडवलात वाढ होणार असल्याचे क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT