सकाळ वृत्तसेवा.Solar Energy Nashik: नाशिक : नाशिक परिमंडळात प्रधानमंत्री सूर्यघर व मुख्यमंत्री सौरकृषी योजनेच्या माध्यमातून सौरऊर्जेची निर्मिती आणि वापर वाढला आहे. यानिमित्ताने घरगुती तसेच कृषी क्षेत्रासाठी शाश्वत वीजपुरवठा उपलब्ध झाला..सौरऊर्जेचा प्रचार-प्रसारासह वापर वाढावा, यादृष्टीने केंद्र सरकार विविध योजना आणि सवलती देत आहे. त्या अंतर्गत पंतप्रधान सूर्यघर योजनेतून घरोघरी सौरपॅनल उभे करतानाच त्यातून सौरऊर्जा निर्मितीवर भर दिला. ‘महावितरण’च्या नाशिक परिमंडळांतर्गत नाशिक तसेच अहिल्यानगर जिल्ह्यांत या योजनेला ग्राहकांची पसंती मिळते आहे. परिमंडळातील साधारणत: ३३ हजार २०० हून अधिक ग्राहकांनी त्यांच्या घरावर सौरपॅनल बसविले. याद्वारे ११६ मेगावॉटहून अधिकची सौरऊर्जा निर्मिती होत असून, त्यातून घरे उजळून निघत आहेत. एवढेच नव्हे, तर ग्राहकांचे वीजबिलही शुन्यावर येण्यास मदत झाली..PM Surya Ghar Yojana: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक हजार घरांवर सौरसंच.राज्यात शेती क्षेत्राला दिवसा आठ तास अखंडित वीजपुरवठ्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाते. या योजनेंतर्गत नाशिक परिमंडळात ४४५ मेगावॉटची वीजनिर्मिती केली जात आहे..PM Surya Ghar Yojana : आठ हजार जणांना ६८ कोटी ७१ लाखांचे अनुदान .ही वीज ६४ उपकेंद्रांना जोडण्यात आली. या केंद्रांच्या माध्यमातून परिसरातील पाच किलोमीटरच्या शेतीला दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात आहे. परिणामी, रात्री-अपरात्री शेतांमध्ये पाणी भरण्यासाठी जाण्यासाठी शेतकऱ्यांचा फेरा वाचला. दरम्यान, परिमंडळात सौरऊर्जा निर्मितीला मिळणारी चालना पाहता येत्या काळात घरगुती, कृषीसह अन्य वर्गातील ग्राहकांना अखंडित, स्वस्तातील वीज उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे..नाशिकमध्ये २९ केंद्रांना वीजजोडणी‘महावितरण’च्या नाशिक परिमंडळात डिसेंबरअखेरपर्यंत एकूण ६४ उपकेंद्रे ही मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेतून जोडली गेली आहेत. त्यात परिमंडळांतर्गत नाशिक मंडळात सर्वाधिक २९ केंद्रे जोडली गेली असून, त्यातून १८८ मेगावॉटची वीजनिर्मिती होत आहे; तर मालेगाव मंडळात २१ उपकेंद्रांतून १२९ आणि अहिल्यानगर मंडळात १४ उपकेंद्रांतून १२८ मेगावॉट वीजपुरवठा केला जात आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.