Nanded Degloor Greenfield Expressway Project: बिलोली : इंदूर-अकोला-नांदेड-हैदराबाद या महत्त्वपूर्ण द्रुतगती महामार्ग साखळीतील नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला निर्णायक गती मिळाली असून, सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत एल. एन. मालवीय इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहे. यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला..प्रस्तावित नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्ग हा जालना-नांदेड द्रुतगती मार्गाशी जोडणाऱ्या स्वतंत्र जोडमार्गासह विकसित केला जाणार असून, मराठवाडा तसेच सीमाभागातील दळणवळण सुलभ होण्याबरोबरच औद्योगिक गुंतवणूक, व्यापारवृद्धी आणि प्रादेशिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..Nanded Dam Water Storage: नांदेडमध्ये प्रकल्पांतील पाण्यात झपाट्याने घट.विशेषतः नांदेड जिल्ह्यातील देगलूर, मुखेड, भोकर तसेच सीमावर्ती ग्रामीण भागांना मोठ्या शहरांशी थेट व जलद संपर्क मिळणार असल्याने कृषी उत्पादनांची बाजारपेठ वाढणे, लघुउद्योग व सेवा व्यवसायांना संधी मिळणे, पर्यटन आणि शैक्षणिक हालचाली सुलभ होणे तसेच रोजगारनिर्मितीला चालना मिळणे असे बहुआयामी लाभ या प्रकल्पातून अपेक्षित आहेत. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता..Nanded DPDC: नांदेडला ७३२ कोटींच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी .विविध टप्प्यांवर निवेदने सादर करणे, प्रत्यक्ष भेटी घेणे तसेच प्रकल्पाच्या तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रियेबाबत पाठपुरावा करणे अशा माध्यमांतून त्यांनी हा विषय केंद्र व राज्य शासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडला होता. त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत सविस्तर प्रकल्प अहवाल प्रक्रियेला प्रारंभ झाल्याचे स्पष्ट झाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.