maximum amount of egg gives by hen  
कृषी पूरक

कोंबडी अंडी देत नाही काय करायचं?

कोंबडी मोठी होत असताना, १७ ते २२ आठवड्यांची झाल्यावर अंडी उत्पादनाला सुरुवात करते. एक कोंबडी एका वर्षात ३०० पर्यंतच अंड्याचं उत्पादन देऊ शकते.

टीम अॅग्रोवन

कुक्कुटपालन व्यवसाय करताना अंड्यांची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या व्यवसायात मोठ्या भांडवलाची गरज लागत नाही. अशा प्रकारे व्यवसाय करताना कुक्कुटपालकांना अंडे (eggs) कसे तयार होते? ग्रामीण भागात अंडी उबविण्यासाठी (eggs Incubation)  खुडूक कोंबडी २१ दिवस बसवून पिलांची निर्मिती करतात किंवा घरच्याच कोंबडीची अंडी उबविण्यासाठी खुडूक कोंबडीखाली ठेवून पिलांची निर्मिती करतात. अथवा परसातील कुक्कुटपालनाचा व्यवसाय वाढवून व्यवसायात सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करतात.

हेही पाहा-वासरू संगोपनात ओळख क्रमांक महत्त्वाचा

कोंबडीची प्रजनन संस्था

प्रत्येक मादी कोंबडीच्या शरीरामध्ये मूत्रपिंडाच्या आतील बाजूस स्त्रीबीज ग्रंथी चिकटलेल्या असतात.  ज्याप्रमाणे कोंबडीच्या (hen) मादी पिलाचे वय वाढत जाते तसतसे स्त्रीबीजग्रंथी ही आकाराने मोठ्या होत जातात.  ज्या वेळेस मादी वयात येते, म्हणजे साधारणपणे १७ ते २१ आठवड्यांची झाल्यावर डाव्या बाजूचे स्त्रीबीजकोश आणि गर्भनिलिका मोठी होत जाते आणि डाव्या बाजूची इंद्रिये बारीक होत नष्ट होऊन जातात.

स्त्रीबीज कोशापासून खालील भागातून एक नागमोडी पांढरी नलिका निघून ती क्‍लोएकामध्ये संपते. या नलिकेस गर्भनलिका म्हणतात. स्त्रीबीज कोशामध्ये मादीच्या जन्मापासूनच ३६०० स्त्रीबीज असतात. ही सर्व स्त्रीबीज कोंबडीच्या पूर्ण आयुष्यात ती सर्वच्या सर्व मोठी, परिपक्व होत नाहीत. त्यातली बरीच आपोआप नष्ट होतात. 

कोंबडीच्या एक वर्षाच्या उत्पादक आयुष्यात जास्तीत जास्त ३०० स्त्रीबीज मोठी होऊन परिपक्व होतात आणि त्याचीच अंडी तयार होतात. म्हणून जगातील सर्वात जास्त अंड्याचं उत्पादन देणारी कोंबडीही २८० ते ३०० अंड्याचं उत्पादन देत असते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Crop Insurance : नांदेडमधील पीकविमा परतावा वितरणासाठी मुहूर्त ठरेणा

Fish Farming : कृषी विभागातर्फे शेती, मत्स्यपालनाचे धडे

Paddy Plantation : पावसामुळे मुरूड तालुक्यातील भात लावणीचे काम पूर्ण

Crop Insurance Scheme : सांगली जिल्ह्यात ८१ हजार शेतकऱ्यांनी घेतला पीकविमा

Banana Crop Insurance : केळीविमाधारकांच्या परताव्यांना विलंब शक्य

SCROLL FOR NEXT