Animal Disease Agrowon
कृषी पूरक

Animal Disease : कसे ओळखायचे जनावरांचे पोटाचे आजार ?

जनावरांचे आरोग्य मुख्यतः पोटाचे आरोग्य आणि कार्यक्षमता यावर अवलंबून असते.

Team Agrowon

जनावरांचे आरोग्य (Animalk Health) मुख्यतः पोटाचे आरोग्य (Stomach Health) आणि कार्यक्षमता यावर अवलंबून असते. जनावरांनी खाल्लेला चारा (Fodder), खुराक पोटात विविध क्रिया होऊन पचवला जातो. त्यातील पोषणतत्त्वे जनावरांच्या शरीरपोषण, आरोग्य आणि उत्पादनासाठी उपयोगी पडतात. पोटाच्या आरोग्यात बिघाड झाल्यास चारा, खुराकाचे पचन नीट होत नाही. परिणामी जनावराचे शरीरपोषणही नीट होत नाही. दूध उत्पादनात घट येते. त्यासाठी पोटाचे विकार वेळीच कसे ओळखायचे याविषय़ी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रफुल्लकुमार पाटील यांनी दिलेली माहिती पाहुया.   

जनावराच्या शेणाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. एकदम पातळ किंवा घट्ट शेण पोटाच्या तक्रारी दर्शवतात. शेण एकदम पाण्यासारखे आहे का? शेणामध्ये चाऱ्याचे, धान्याचे कण आहेत का? शेण जास्त प्रमाणात की कमी प्रमाणात टाकले जाते? जनावर दिवसातून किती वेळा शेण टाकते? शेण टाकताना जनावरास त्रास होतो का? शेणात चिकट स्त्राव आहे का? या सर्व बाबींवरून जनावरात पोटाचे विकार झाल्याचे स्पष्ट होते.

जनावराच्या हालचालींचे निरीक्षण करावे. जनावर सतत ऊठ-बस करते का? जमिनीवर पडून पोटावर लाथा मारते का? या बाबींचे निरीक्षण करावे.

पोटात वेदना होत असतील तर जनावर कण्हत, विव्हळत असते.

जनावराचे पोट फुगलेले किंवा एकदम आत गेले असल्यास, पोटफुगी किंवा चारा न खाणे या गोष्टींचे निदान करता येते.

काही वेळा जनावराच्या पोटामध्ये गॅस होतो. अशावेळी जनावराच्या डाव्या बाजूच्या त्रिकोणाकृती भकाळीवरून पोटावर हळूवार बोटांनी मारल्यास डबडब असा आवाज येतो. पोट गच्च असेल तर आवाज येत नाही. तसेच गच्च पोटावर बोटांनी दाबल्यास बोटांचे व्रण उमटतात.

पोटाच्या डाव्या बाजूच्या भकाळीवरून हाताची मूठ बंद करून दाब दिल्यास ५ मिनिटांमध्ये ७ वेळा हात बाहेर ढकलला जातो. जर पोटाचे आरोग्य चांगले असेल तरच असे होते. मात्र, पोटामध्ये काही समस्या असेल तर ५ मिनिटांमध्ये ५ पेक्षा कमी वेळा हात बाहेर ढकलला जातो.

पोटाच्या तक्रारीमध्ये कधीकधी पोटातील गॅस गुदद्वारामधून बाहेर टाकला जातो.

पोट जास्त गच्च असेल तर जनावर सतत पाठ ताणत असते.

पोटाच्या तक्रारींमध्ये जनावराच्या पोटाजवळ गेल्यास गड-गड असा आवाज येतो.

जनावराच्या पोटात काही तक्रारी असल्यास चारा कमी खाणे, अपचनासारखी लक्षणे दिसून येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

Pune Dams: धरण साखळीतील साठा ९६.८२ टक्क्यांवर

Marathi Literary Conference: दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन तंजावरला होणार

Agriculture PG Admission: केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरी आजपासून पुण्यात सुरू

Maharashtra Rain Forecast: राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT