how to stop milking of pregnant cow ? 
कृषी पूरक

गाय आटवताना घ्यायची काळजी

गाभण जनावरांच्या अवस्थेनुसार आरोग्याच्या दृष्टीने कासेला योग्य आराम मिळणे गरजेचे असते. शास्त्रानुसार गायीला साधारण किमान १०० दिवस आणि म्हशीला किमान १२० ते १५० दिवस आटविणे गरजेचे असते.

टीम अॅग्रोवन

गाभण जनावरांच्या अवस्थेनुसार आरोग्याच्या दृष्टीने कासेला योग्य आराम मिळणे गरजेचे असते. शास्त्रानुसार गायीला साधारण किमान १०० दिवस आणि म्हशीला किमान १२० ते १५० दिवस आटविणे गरजेचे असते. या काळात गर्भाची ७० टक्के वाढ होत असते. तसेच दूध तयार करणाऱ्या पेशींचे पुर्नजीवन होत असते. गाय आटविताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण अशा काळात गाभण जनावरांवर ताण येऊ शकतो.

हेही पाहा- दुभती जनावरे आटविताना घ्यायची काळजी

  गाय आटविण्याच्या पद्धती गाय आटवताना शेवटच्या दोन-अडीच महिन्यांमध्ये टप्याटप्याने खुराक कमी करावा. गायीला ओल्या चाऱ्याऐवजी सुक्या चाऱ्याचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे. दुधाचे प्रमाण कमी होऊ लागताच दूध काढण्याच्या वेळेतील अंतर वाढवत न्यावे. सुरुवातीला एका वेळेला धार काढावी. दुधाचे प्रमाण कमी होताच एक दिवस आड त्यानंतर तीन दिवस आड दूध काढावे आणि त्यानंतर पूर्ण बंद करावे. शेवटची धार काढताना सड पूर्ण पिळून घ्यावा.

पशुवैद्कीय सल्ल्यानुसार सडामध्ये प्रतिजैविकांची ट्युब सोडावी. गाय आटविताना गोठा आणि गोठयातील जमीन कोरडी राहील याची दक्षता घ्यावी. त्याच प्रमाणे सडाला किंवा कासेला जखम झाल्यास दुर्लक्ष करु नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Family Compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत; २५ कोटी मंजूर

Fake Fertilizer Sale: भोकरमध्ये बनावट खत विक्रीचा पर्दाफाश

Heavy Rainfall Impact: वादळाचा वीज महावितरणला झटका

Fertilizer Supply Issue: मंजूर साठ्यापेक्षा ४ हजार ४२८ टन कमी खताचा पुरवठा

Kharif Season Preparation: खरीप हंगामासाठी गावोगावी तयारीला वेग

SCROLL FOR NEXT