how to make khoa by differtent methods?
how to make khoa by differtent methods? 
कृषी पूरक

खवा बनवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत ?

टीम अॅग्रोवन

सुधारित भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक नियमावली,२०११ नुसार, गायीचे किंवा म्हशीचे किंवा संमिश्र दुधाला तापवून, त्यातील पाण्याचा अंश कमी करून उरलेले ३० टक्के स्निग्धांश म्हणजे खवा होय.

हेही पाहा-  डेअरीला दूध घातल्याने नफा मिळत नव्हता... 

खवा बनवण्याच्या पद्धती पारंपरिक पद्धत- खवा (khoa) बनविण्यासाठी प्रमुख्याने म्हशीच्या दुधाचा (buffalo milk) वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीत दूध लोखंडी कढईत घेतले जाते, लाकूड, पारंपारिक वैरण वापरून कढईला उष्णता देऊन उकळले जाते. दूध उकळत असताना लोखंडी सराट्याने सतत ढवळले पाहिजे. त्यामुळे ते खाली बुडाला चिकटून करपणार नाही. हळू-हळू दुधाचे बाष्पीभवन होऊन त्यापासून घट्ट मऊसर पदार्थ बनू लागतो. अशा वेळेस उष्णतेचे प्रमाण कमी करावे. तयार होणारा पदार्थ खाली लागणार नाही याची काळजी घ्यावी. तयार झालेला पदार्थ कढईला चिकटून न बसता सोडू लागला की खवा पूर्णपणे तयार झाला असे समजावे.

आधुनिक पद्धत- अ.    स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड (Satinles steel Double Jacketed) उपकरण - या पद्धतीत खवा बनविण्यासाठी गरम वाफेचा (steam) आणि स्टेनलेस स्टील डबल जॅकेटेड उपकरणाचा वापर केला जातो. या पद्धतीने खवा बनविल्यास त्याला धुराचा किंवा जळका वास येत नाही. खवा एकजीव, पांढरा शुभ्र बनतो. पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीमधील फरक हाच आहे की, आधुनिक पद्धतीत उष्णतेसाठी वाफेचा वापर केला जातो. कमी प्रमाणात खव्याची निर्मिती करत असलेल्या उद्योजकांना ही पद्धत परवडणारी नाही.

ब. कंटीन्यूअस खवा मेकिंग मशीन (Continous khoa Making machine)-  सध्या सलग खवा बनविणारे मशीन विकसित झाले आहे. यात प्रिहीटींग सिलेंडर (preaheating cylinder) आणि दोन कॅस्केडिंग पॅन बसवलेले असतात. सर्व प्रथम दूध हे प्रिहीटींग विभागात आल्यानंतर तेथे गरम केले जाते. साधारणतः १० ते १२ मिनिटात एकूण दुधातील ३० ते ३५ टक्के सॉलिड घटक एकाग्र होतात. हे एकाग्र झालेले घनघटक पहिल्या कॅस्केडिंग पॅनमध्ये जातात.  तिथे ७ ते ८ मिनिटात पुन्हा ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत एकजीव होतात. हे घनघटक परत दुसऱ्या कॅस्केडींग पॅनमध्ये जाऊन खव्यासाठी अपेक्षित ६५ते ७० टक्के घनघटक मिळतात.   सरासरी म्हशीच्या ४ लिटर दुधापासून किंवा गायीच्या ५ लिटर दुधापासून १ किलो खवा मिळतो. खव्याची उत्पादकता ही दुधाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. पूर्ण तयार झालेल्या खव्यातील ओलावा आणि खवा तयार होताना केली जाणारी हाताळणी यासाठी महत्तम मानली जाते.  दुधात फॅट (fat) कमी असल्यास खवा कोरडा बनतो. दुधात भेसळ असल्यास खवा कठीण बनतो. खवा तयार करण्यासाठी शक्यतो म्हशीचे दूध वापरावे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Update : गुणवत्तापूर्ण बियाणे, खते शेतकऱ्यांना द्या : इटनकर

Summer Weather : परभणीत दिवसाचा पारा ४३ अंशांवर

Water Stock : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Flower Rate : लग्नसराईमुळे फुलांच्या दरांत वाढ

Anandacha Shidha : आनंदाच्या शिध्याची प्रतीक्षा

SCROLL FOR NEXT