Infectious Animal Diseases Agrowon
कृषी पूरक

Animal Diseases : जनावरांना कसा होतो दुग्धज्वर आजार?

Animal Care : हिवाळ्यात गायी म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. विलेल्या जनावरांना याच काळात आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर.

Team Agrowon

Animal health : हिवाळ्यात गायी म्हशी विण्याचे प्रमाण जास्त असते. विलेल्या जनावरांना याच काळात आहारातील पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळे विविध चयापचयाचे आजार होतात. यामध्ये प्रामुख्याने आढळणारा आजार म्हणजे दुग्धज्वर. हा आजार प्रामुख्याने जास्त दूध देणाऱ्या संकरित गाई आणि म्हशींमध्ये आढळून येतो.

दुग्धज्वर आजाराचा प्रादुर्भाव साधारणपणे व्यायल्यानंतर पहिल्या ७२ तासांपर्यंत जास्त प्रमाणात आढळून येतो. गाभण काळातील शेवटचा टप्पा व व्यायल्यानंतर जास्त दूध उत्पादनाचा काळ यामध्ये दुधाळ जनावरांची निगा, आरोग्य, आहार व व्यवस्थापन योग्यप्रकारे न करणे हे चयापचय आजार होण्यामागचे मुख्य कारण आहे.

दुभत्या जनावरांमध्ये तिसऱ्या ते पाचव्या वेतामध्ये आजार दिसतो. पहिल्या किंवा दुसऱ्या वेतामध्ये जनावराची चाऱ्यातील क्षार शोषण्याची क्षमता तसेच हाडांमध्ये असलेले जास्त कॅल्शिअमचे प्रमाण यामुळे आजार होण्याचा धोका फार कमी असतो. आजार मुख्यत्वे संकरित गाई (५ ते ७ टक्के) आणि म्हशींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. रक्तातील कॅल्शिअम कमतरतेमुळे आजार होतो. प्रसूतीनंतर दूध देण्याचा कालावधी तसेच चीक आणि दूध उत्पादनासाठी कॅल्शिअमची मागणी शरीराच्या कॅल्शिअम पुरवठा करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते, तेव्हा आजार दिसतो.

गाय आणि म्हैस व्यायल्यानंतर ४८ ते ७२ तासांच्या आत अचानक कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते. व्यायल्यानंतर १ ते ३ दिवसांत आजाराची लक्षणे दिसतात. जनावर अस्वस्थता आणि अशक्तपणा येऊन खाली बसते. दुधाळ गायी, म्हशींमध्ये कॅल्शिअमची सामान्य पातळी ८-१२ मिलि/डीएल असते. जेव्हा ही पातळी ५.५ मिलि/डीएल पेक्षा कमी होते, तेव्हा आजाराची लक्षणे दिसतात. शरीरातील उर्वरित कॅल्शिअम स्नायूंमधून वापरले जाते. यामुळे शेवटी पक्षाघात आणि मज्जासंस्थेच्या आजाराची लक्षणे दिसून येतात.

आहारातील कॅटायन आणि अनायन असंतुलनामुळे दुग्धज्वर होतो. उच्च डी कॅड असलेले पशुखाद्य आहारामध्ये आल्यास या आजाराची शक्यता वाढवते. आहारामध्ये नकारात्मक डी कॅड हा आजार रोखू शकते.

विण्यापूर्वी आहारामधील कॅल्शिअम सामग्रीऐवजी डी कॅड कमी करणे, ही आजार टाळण्याचा उपाय आहे. कारण कॅल्शिअमचे प्रमाण कमी करण्यासाठी भाकड गायींना जास्त खुराक किंवा तृणधान्ये खायला देणे घातक ठरू शकते. यामुळे गाईंना फॅटी लिव्हर सिंड्रोम, किटन बाधा, अतिरिक्त ऊर्जेच्या घनतेमुळे पोट सरकणे यांसारख्या इतर गुंतागुंत होण्याची शक्यता असते.

डी कॅडचे संतुलन राहण्याकरिता प्रसूतिपूर्व गायींच्या आहारामध्ये अॅनिओनिक क्षार (म्हणजे क्लोराइड, सल्फर किंवा फॉस्फरसचे क्षार) पुरवठा केल्याने ही परिस्थिती टाळता येते. सामान्यतः दुभत्या गायींच्या आहारामध्ये डी कॅडची पातळी +१०० ते +२०० meq/kg असते. अॅनिओनिक क्षार किंवा आहारामध्ये खनिज आम्ल जोडल्याने डी कॅड पातळी घटते आणि दुग्धज्वराचे प्रमाण कमी होते.

हा आजार मुख्यतः माफक हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे आणि व्यायल्यानंतर उच्च दूध उत्पादन असणाऱ्या जनावरांमध्ये बघायला मिळतो. चीकामधील कॅल्शिअम रक्त पुरवठ्यापेक्षा आठ ते दहा पट जास्त असू शकते. हे प्रमाण रक्तामध्ये हाडांमधून सोडलेल्या कॅल्शिअमपेक्षा जास्त असते. म्हणून रक्तामधील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होते.

अशा जनावरास दुग्धज्वर होतो. याव्यतिरिक्त, इतर चयापचय विकारांमुळे क्लिनिकल आणि सबक्लिनिकल हायपोकॅलेसिमिया होऊ शकतो (म्हणजे बद्धकोष्ठता होणे, पोट सरकणे, जार अडकणे, गर्भाशय विकार, गर्भाशयस्नायू दाह आणि किटन बाधा (केटोसिस).

-----------

माहिती आणि संशोधन - महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

Book Review: ध्यासपंथी वाटचालींचा कोलाज

Rural Development: शेतकरी, ग्रामीण विकास आणि पर्यावरणाचा एकत्र विचार व्हावा

SCROLL FOR NEXT