आपल्याकडील जैवविविधतेचा (biodiversity) विचार करता, आजूबाजूच्या परिसरात विविध प्रकारची झाडे आढळून येतात. याच झाडांचा, वनस्पतींचा वापर आपण जनावरांच्या आहारात करू शकतो. यापैकी अनेक वनस्पतीच्या पाल्याचा वापर मानवी आहारात देखील केला जातो. (Hadga Information)
हादगा (hadga) हे असेच एक दुर्मिळ होत चाललेले चाऱ्याचे झाड आहे. या झाडाची लागवड करण्यासाठी रोपे आणि बियांचा वापर केला जातो. याच्या फुलाचा वापर मानवी आहारात भाजी म्हणूनही केला जातो. यासोबतच हादग्याच्या कोवळ्या शेंगाचीही भाजी केली जाते. या झाडाच्या पाल्याचा वापर जनावरांसाठी व शेळी पालनासाठी (goat farming) चारा म्हणून करता येतो.
हादगा या झाडाला अगस्ता (agsthi) असे देखील म्हटले जाते. हे झाड बहुवार्षिक असून, या झाडाची वाढ झपाट्याने होत असते. आयुष्यमान साडे तीन ते चार वर्षे इतके असते. उंची १५ ते २० फुटापर्यंत वाढते. या पाल्यात जीवनसत्त्व अ आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. पाला औषधी असून शेळ्यांना प्रामुख्याने हाद्ग्याचा चारा दिला जातो.
शेळ्या हादग्याची पाने आणि फुले आवडीने खातात. या झाडाची साल, पाने आणि मुळांचा वापर औषधामध्ये केला जातो. शेंग शेवग्याच्या शेंगांसारखीच असते, परंतु पातळ आणि चपटी असते. एका शेंगेमध्ये २५ ते ३० हाद्ग्याच्या बिया असतात. सप्टेंबर ते जानेवारी महिन्यात या झाडाला फळे व फुले येत असतात. फुलांचा रंग पांढरा ते पिवळसर पांढरा असून देठ हिरवा असतो.
ओलावा असलेल्या जमिनीत हादग्याच्या बियांची लागवड करावी. यासाठी एक फूट अंतरावर प्रत्येक ठिकाणी ४ ते ५ पाच बिया टाकाव्यात.
हादग्याचे झाड बहुवार्षिक आहे. म्हणजे एकदा केलेली लागवड, अनेक वर्ष उत्पन्न देऊन जाते. या झाडाची पाने सतत खुडून घेतल्यावर त्याला सतत नवनवीन पालवी फुटत राहते. याचा चारा पौष्टिक असून जनावरे आवडीने खातात. तसेच हे पिक अत्यंत गुणकारी आहे.
चाऱ्याच्या पिकासाठी शेणखताबरोबर युरिया खताचा जास्त वापर करावा. जेणेकरून या चाऱ्याची वाढ भरपूर होईल. जनावरांच्या गरजेप्रमाणे सकस चारा मिळण्याच्या दृष्टीने रोज संमिश्र पद्धतीने कापणी करून जनावरांना हिरवा चारा खाऊ घालावा.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.