Floppy Kid Syndrome 
कृषी पूरक

करडू उभे का राहत नाहीत?

जन्माला आलेली करडे १० ते २० दिवसांची असताना जर ते उभे राहत नसतील, खालीच बसून राहत असतील तर त्यांना फ्लॉपी कीड सिंड्रोम हा आजार झालाय असेसमजावे.

टीम अॅग्रोवन

जन्माला आलेली करडे १० ते २० दिवसांची असताना जर ते उभे राहत नसतील, खालीच बसून राहत असतील तर त्यांना फ्लॉपी कीड सिंड्रोम हा आजार झालाय असे समजावे. हा आजार करडांंमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतो. करडे बकरीच्या सडाला तोंड लावतात पण दूध पीत नाहीत. पण पशुपालकांना या आजाराबद्दलची पुरेशी माहिती नसल्यानेे करडांंचा मृत्यु होऊन नुकसान होते. आज आपण करडामधील फ्लॉपी कीड सिंड्रोम माहिती घेऊया.

सुरुवातीला पाहूया याची कारणे काय आहेत -

शेळ्यांना आणि करडांना एकाच ठिकाणी बांधल्याने करडांनी जास्त प्रमाणात दूध पिल्याने त्यांना अपचन होते. अशा परीस्थित करडांना विषबाधा होऊन, ते कोमामध्ये जातात. ई. कोलाय या जीवाणुमुळे देखील फ्लॉपी कीड सिंड्रोम होताना दिसून येतो.

यात करडांना नीट उभेे राहत नाही. उभे राहण्याचा प्रयत्न केल्यास खाली पडतात. करडांना मागील पायाचा पॅरालिसीस (Paralysis) झाल्याने करडे एका ठिकाणी शांत बसून राहतात. करडांच्या मांसपेशी कमकुवत झाल्याने करडे आडवे पडून राहतात.

यावर उपाय म्हणून ३६ तासांसाठी म्हणजे दीड दिवस करडांंचे दूध पिणे बंद करावे. खाण्याचा सोडा, ग्लुकोज (Glucose) पावडर प्रत्येकी एक चमचा आणि अर्धा चमचा एलेक्ट्रॉल पावडर एक ग्लास पाण्यात मिक्स करून दर तीन तासांनी १० मिली सिरींजच्या सहाय्याने तोंडाद्वारे पाजावे. उपचार सुरु केल्यानंतर २ ते ३ दिवसात करडांंमध्ये सुधारणा दिसायला लागेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT