चीनने पुन्हा एकदा युरिया आणि विशिष्ट खतांची निर्यात थांबवली आहे यात टीएमएपी, डीएपी, युरिया सारख्या खतांचा समावेशरब्बी हंगामात खतांची टंचाई निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता .Fertilizer Prices: चीनने पुन्हा एकदा युरिया आणि विशिष्ट खतांची निर्यात स्थगित केली आहे. यात टीएमएपी (टेक्निकल मोनोअमोनियम फॉस्फेट) आणि अॅडब्लू सारखी युरिया-द्रावण उत्पादने, डाय- अमोनियम फॉस्फेट (डीएपी), युरिया सारख्या खतांचा समावेश आहे. ही स्थगिती १५ ऑक्टोबरपासून लागू केली असून ती पुढील पाच ते ६ महिने लागू राहू शकतो. यामुळे रब्बी हंगामात खतांची टंचाई निर्माण होऊन किमती वाढण्याची शक्यता आहे, असे खत उद्योगातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले..चीनने १५ मे ते १५ ऑक्टोबर दरम्यान तपासणीसह खतांची निर्यात पुन्हा सुरू केली होती. आता पुढील सूचना मिळेपर्यंत निर्यातीला स्थगिती दिली आहे. यामुळे केवळ भारतातील नव्हे तर जगातील बाजारपेठांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे..Fertilizer Rate : खतांच्या वाढत्या किमतींचा भार देशातील शेतकऱ्यांवर नाही."चीनने १५ ऑक्टोबरपासून केवळ भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगातील बाजारासाठी निर्यात बंद केली आहे," असे सॉल्युबल फर्टिलायजर असोसिएशनचे (SFIA) अध्यक्ष राजीव चक्रवर्ती यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. "माझ्या माहितीनुसार, ही निर्यात स्थगिती पुढील ५ ते ६ महिन्यांसाठी राहील, असेही ते म्हणाले.भारतात विशिष्ट खतांपैकी सुमारे ९५ टक्के आयात केली जातात. त्यात टीएमएपी सारखे फॉस्फेट आणि अॅडब्लू सारखे उत्सर्जन-नियंत्रण द्रव यांचा समावेश आहे..Fertilizer Management : माती, पर्णदेठ परीक्षणानुसार खत व्यवस्थापन फायद्याचे .चीनच्या निर्यात लागू केलेल्या निर्बंधांमुळे, आधीपासूनच उच्च पातळीवर पोहोचलेल्या विशिष्ट खतांच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढू शकतात, असा अंदाज चक्रवर्ती यांनी व्यक्त केला आहे. .भारतात दरवर्षी सुमारे २ लाख ५० हजार टन विशिष्ट खतांचा वापर केला जातो. त्यातील ६० ते ६५ टक्के खते ऑक्टोबर ते मार्च दरम्यानच्या रब्बी हंगामात वापरली जातात..सध्या सुरू झालेल्या रब्बी हंगामात मागणीची पूर्तता करणे ही समस्या नाही. कारण व्यापाऱ्यांनी जागतिक व्यापार एजन्सींकडून आधीच पुरवठा निश्चित करुन ठेवला आहे. पण दरावर परिणाम होऊ शकतो, असेही खत उद्योगाचे म्हणणे आहे..रब्बी हंगामाचा कालावधी मार्चपर्यंत वाढणार"जर मार्च २०२६ नंतरही चीनकडून निर्यातीवरील निर्बंध कायम राहिले तर ते अधिक चिंतेचे ठरू शकते," असे चक्रवर्ती म्हणाले. यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने रब्बी हंगामाचा कालावधी या वर्षी मार्चपर्यंत वाढू शकतो, असे त्यांनी नमूद केले. भारताकडे दक्षिण आफ्रिका, चिली आणि क्रोएशिया या देशांतून पुरवठा होईल, असे पर्यायी स्रोत आहेत. पण हे केवळ एक अथवा दोन उत्पादनांसाठी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.