सरकार दिवाळीच्या आधी २ हजारांचा हप्ता जारी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होतीपण अद्याप सरकारकडून काही हालचाली नाहीतसरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २१ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो.PM Kisan 21st Installment: देशातील कोट्यवधी शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. सरकार दिवाळीच्या आधी २ हजार रुपयांचा हप्ता जारी करेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण २१ वा हप्ता खात्यात कधी जमा करणार? याबाबत सरकारकडून अद्याप काही सांगण्यात आलेले नाही..दरम्यान, आता असे दिसून येते की सरकार दिवाळीत पीएम किसानचे पैसे जमा करणार नाही. तर पुढील हप्ता नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हस्तांतरित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे..PM Kisan 21st Installment Date: शेतकऱ्यांना दिवाळीत पीएम किसानचा २१ वा हप्ता मिळेल का?; तपासा तुमचे लाभार्थी स्टेटस.काही रिपोर्टनुसार, केंद्र सरकारकडून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात २१ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या काही दिवस आधी याबाबत घोषणा होऊ शकते, असे मानले जात आहे. .बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर असे दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर निकाल १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होईल. दरम्यान, बिहारमध्ये आचारसंहिता लागू असल्याने निवडणूक काळात सरकार पीएम किसानचा हप्ता जारी करेल की नाही, याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, तज्ज्ञांच्या मते, निवडणूक आचारसंहितेच्या काळात सरकार कोणतीही नवीन योजना जाहीर करु शकत नाही. पण पूर्वी मंजूर केलेल्या योजनांचे पेसे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात..PM Kisan Yojana : पीएम किसान निधीच्या २१ व्या हप्त्यापूर्वी ३१ लाख शेतकऱ्यांची नावे वगळली?; केंद्राचे मोठे पाऊल.'या' राज्यांत २१ वा हप्ता आधीच जारी केला केंद्र सरकारने अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या राज्यांमध्ये २१ वा हप्ता आधीच जारी केला आहे. २६ सप्टेंबर रोजी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील शेतकऱ्यांसाठी हा हप्ता जारी केला होता. त्यानंतर, ७ ऑक्टोबर रोजी जम्मू आणि काश्मीरमधील शेतकऱ्यांनाही पीएम किसानचे पैसे देण्यात आले..PM किसान सन्मान योजनेविषयी...पंतप्रधान किसान सन्मान निधी ही योजना फेब्रुवारी २०१९ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेनुसार, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) च्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार रुपयांच्या रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये थेट हस्तांतरित केली जाते..छोटे आणि सीमांत शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी आणि उदरनिर्वाहासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. या योजनेचा २० वा हप्ता ऑगस्टमध्ये जारी करण्यात आला होता. ज्याचा सुमारे साडेआठ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता..'या' शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीज्या शेतकऱ्यांनी ई- केवायसी (eKYC) पूर्ण केलेली नाही अथवा ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले नाही, त्यांना या योजनेचा हप्ता मिळणार नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.