Amravati News: शाळांमधून इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येत असलेल्या मध्यान्ह भोजनाच्या पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेचे अनुदान मागील चार महिन्यांपासून थकित आहे. त्यामुळे मुख्याध्यापकांची आर्थिक कुचंबणा होत असल्याने त्यांच्यात प्रचंड असंतोष पसरला असल्याचे दिसून येत आहे..स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळेत दररोज मध्यान्ह भोजन दिल्या जाते. योजनेसाठी आवश्यक धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा शासनामार्फत होत असतो. परंतु इंधन, भाजीपाला आणि पूरक आहाराचा खर्च मात्र शाळा व्यवस्थापन समितीला महिना अखेरीस उपलब्ध करून दिल्या जातो..PM Poshan Shakti: राज्यातील शाळांमध्ये ६८ हजारांवर परसबागा विकसित.इयत्ता पहिली ते पाचवीकरिता प्रति विद्यार्थी २.५९ रुपये, तर इयत्ता सहावी ते आठवीकरिता ३.८८ रुपये अनुदान अनुज्ञेय असते. शासनाकडून हा निधी शाळांना उपलब्ध होईपर्यंत हा सर्व खर्च मुख्याध्यापकांना स्वतःजवळून करावा लागतो. परंतु मागील जून महिन्यापासून चार महिन्यांचे अनुदान थकित असल्याने या योजनेचा खर्च मुख्याध्यापकांना स्वतःच्या खिशातून करावा लागत आहे..त्यामुळे मुख्याध्यापकांकडून संताप व्यक्त होत आहे. मागील दोन वर्षे या योजनेंतर्गत आठवड्यातून एक दिवस अंडी अथवा केळी देण्याची तरतूद करण्यात आली होती. या वर्षी मात्र या योजनेतून अंडी व केळी गायब झाल्याचे चित्र आहे..Mid-day Meal Scheme: शालेय पोषण आहारातील अंड्यांच्या समावेशाला धार्मिक संघटनांचा विरोध .मागील वर्षी तीन महिन्यांचा अग्रिम निधी शाळा व्यवस्थापन समितीला उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे या वर्षीसुद्धा अग्रिम उपलब्ध होईल, अशी मुख्याध्यापकांची अपेक्षा होती, परंतु अग्रिम तर सोडाच दरमहा खर्चाचा निधीसुद्धा थकित आहे..मुख्याध्यापकांनी स्वतःच्या खिशातून योजनेची अंमलबजावणी कशी व का करावी, हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनाच्या योजनेचे अनुदान थकित असणे ही बाब दुर्दैवी व तेवढीच संतापजनक आहे. शासनाने हे थकित अनुदान तातडीने उपलब्ध करून द्यावे.राजेश सावरकर, राज्य प्रसिद्धी प्रमुख, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.