earthworm 
कृषी पूरक

गांडूळखत निर्मितीसाठी या जाती वापराव्यात ?

गांडूळ खत उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळ खत निर्मितीचे तंत्र सोपे असून, महिला सहजरीत्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात. उत्तम प्रकारे तयार झालेले गांडूळखत, सैल, भुसभुशीत, चहाच्या भुकटीसारखे रंग गडद काळा (ह्युमससारखा) रंग असतो. त्याला आल्हादकारक मातीचा वास येतो. त्याचे स्वरूप कणीदार असते. त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते.

टीम अॅग्रोवन

गांडूळ खत (vermicompost) उपलब्ध सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत मानले जाते. गांडूळ खत निर्मितीचे तंत्र सोपे असून, महिला सहजरीत्या हे तंत्रज्ञान आत्मसात करून शेतावर गांडूळ खताची निर्मिती करू शकतात. उत्तम प्रकारे तयार झालेले गांडूळखत, सैल, भुसभुशीत, चहाच्या भुकटीसारखे रंग गडद काळा (ह्युमससारखा) (humus) रंग असतो. त्याला आल्हादकारक मातीचा वास येतो. त्याचे स्वरूप कणीदार असते. त्यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते. हेही पाहा- डेक्कनी मेंढीचे आरोग्य व्यवस्थापन कसे कराल? गांडुळाचे प्रकार :

  • एपिजिक (Epigic) गांडुळे ही जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापैकी ८० टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात. २० टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
  •  अॅनेसिक (Anasenic) ही गांडुळे साधारणत: जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात. ते सेंद्रिय पदार्थ आणि माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
  • एण्डोजिक (Endogenic) ही गांडुळे जमिनीत तीन मीटर किंवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो. ते बहुधा माती खातात. प्रजननाचा दर अतिशय कमी असतो.
  • हेही वाचा- परोपजीवींचा जास्त प्रादुर्भाव मेंढ्यांना होतो! गांडुळांच्या ३०० हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने आयसेनिया फेटीडा (Eisenia Foetida) ही जात वापरली जाते. या जातीतील गांडुळांची (eartworm) वाढ चांगली होऊन त्यांच्यामुळे खत तयार करण्याची प्रक्रिया ४० ते ४५ दिवसांत होते. हे गांडूळ स्वत:च्या वजनाइतके अन्न रोज खातात.

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

    Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

    Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

    Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

    Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

    SCROLL FOR NEXT