दही हा शब्द तसा आपल्या ओळखीचाच. पण दह्याबरोबर किंबहुना दह्यासारखा दिसणारा एक पदार्थ आज बाजारात उपलब्ध आहे, ज्याच नाव आहे योगर्ट. हे दोन्ही पदार्थ सारखेच वाटतात कारण त्याची चव काहीशी सारखी असते.
असे असले तरी ते एकसारखे नाहीत. मात्र बनतात एकाच पदार्थापासून म्हणजे दुधापासून. हे दोन्ही पदार्थ दुधात वेगवेगळ्या प्रकारे यीस्ट बनवून तयार केले जातात. दही आणि योगर्ट हे जरी एकसारखे वाटत असले तरी ते बनविण्याच्या पद्धतीपासून त्यांच्यातील पोषकतत्त्वांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये वेगळेपणा आहे.
योगर्ट -
योगर्ट (Yogurt) दुधापासून बनविलेला असा पदार्थ आहे, जो बनविण्यासाठी दुधात बॅक्टेरियाच्या मदतीने यीस्ट तयार केले जाते. यासाठी वापरण्यात येणाऱ्या बॅक्टेरियाला 'योगर्ट कल्चर' म्हणतात.
जेव्हा हे कल्चर दुधात टाकले जाते, त्यानंतर दुधातील लॅक्टोज आंबून लॅक्टिक अॅसीड तयार होते. ह्या पद्धतीने योगर्ट तयार केले जाते.
लॅक्टिक असिड बनविणाऱ्या 'योगर्ट कल्चर' ह्या बॅक्टेरियामुळे (Bacteria) योगर्टला आंबटगोड चव येत असते.
बऱ्याच लोकांना दुधातील शर्करेची अॅलर्जी असते असे लोक योगर्टच सेवन करू शकतात. कारण हे लॅक्टोजविरहीत असते.
योगर्ट घरी बनविने तेवढ सोप्प नाहीय. पण बाजारात आपल्याला विविध चवीच योगर्ट सहज उपलब्ध आहेत.
योगर्ट मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोबायोटीक्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात,म्हणून योगर्ट खाणे शरीरासाठी चांगल असत.
दही-
दही (Curd) हे आपण अगदी सोप्या पद्धतीने घरी बनवू शकतो. ह्यासाठी थोडसं दही गरम दुधात मिसळून त्याला रात्रभर ठेवल्यास दुसऱ्या दिवशी दही तयार होते.
दह्यात योगर्टपेक्षा जास्त आंबटपणा असतो. पण दह्यात योगर्टच्या तुलनेत कमी कॅलरीज असतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.