Conference on Sugar Industry  
कृषी पूरक

साखर उद्योग वैचारिक सेतू परिषदेचे आयोजन 

साखर उद्योगासमोरील समस्या, त्यांच्या निवारणासाठीच्या उपाययोजना यांवर खल होणार आहे. पुढील आव्हानांना कसे सामोरे जावे, उसतोड कामगार, कर्मचारी, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, राज्य अथवा केंद्र सरकारकडे धोरणात्मक बदल करण्यासाठीपाठपुरावा करणे, त्यासाठी अंतिम प्रस्ताव सादर करता येईल का? यावर चर्चा होणार आहे.

टीम अॅग्रोवन

साखर उद्योगाशी (Sugar Industry) संबंधित असलेल्या सर्व स्टेक होल्डर्स म्हणजे उस उत्पादक (Sugar Producer), भागधारक सभासद, व्यवस्थापन (Managment), उस तोड कामगार, ग्रामस्थ, तज्ज्ञांमध्ये वैचारिक सेतु बांधून सुसंवाद साधण्यासाठी वैचारिक सेतू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २३ मार्च रोजी पुण्यातील विशाल सह्याद्री सदन येथे ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. 

या बैठकीत साखर उद्योगातील (Sugar Industry) समस्यांवर सविस्तर संवाद साधला जाणार आहे. सद्यस्थितील साखर उद्योगासमोरील (Sugar Industry) समस्या, त्यांच्या निवारणासाठीच्या उपाययोजना यांवर खल होणार आहे.

पुढील आव्हानांना कसे सामोरे जावे, उसतोड कामगार, कर्मचारी, शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, राज्य अथवा केंद्र सरकारकडे धोरणात्मक बदल करण्यासाठी, पाठपुरावा करणे, त्यासाठी अंतिम प्रस्ताव सादर करता येईल का?  यावर चर्चा होणार आहे.

व्हिडीओ पहा- 

या परिषदेमध्ये साखरेची विक्री किंमत (MSP), साखरेला द्विस्तरीय भाव, दोन साखर कारखान्यामधील हवाई अंतर, इथेनॉल निर्मिती व त्याचा एफआरपीवर (FRP) होणारा परिणाम, अतिरिक्त उस प्रश्न, इतर उपपदार्थाचे मूल्यवर्धन, नफा निधीचे वाटपसुत्र अशा महत्वाच्या विषयावर आजी, माजी एम.डी.,सीईओ, अभ्यासक, इथेनॉल कन्सलटंट मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे साखर उद्योगातील भागीदारांसह सर्वांनी उपस्थित राहुन ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Demands: राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर करा : ठाकरे

Mumbai March Suspended: जरांगे यांचे उपोषण मागे

Monsoon Rainfall Deficit : यंदाचा मॉन्सून २००९ नंतरचा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता; पावसाची तूट १५ टक्क्यांवर

Agarwood Farming: अगरवूड लागवड : सुवर्णसंधी की सुवर्णमृग?

SCROLL FOR NEXT