Wild animal damage compensation. Agrowon
कृषी पूरक

तुमची शेळी कधी बिबट्याने खाल्लीय का?

बिबट्या साधारणपणे रात्रीच्या वेळी बाहेर पडून हल्ला करतो. बिबट्या बहुतांश वेळा रात्रीच्या वेळी शेळ्यांच्या शेडमध्ये प्रवेश करत असतो. गायी-म्हशींवर चरत असताना बिबट्या हल्ला करू शकतो.

Team Agrowon

महसूल व वनविभागाने (Revenue department) ११ नोव्हेंबर २०१६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार वन्य प्राण्यांमध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, रानकुत्रे यांसारख्या प्राण्यांचा समावेश होतो. या प्राण्यांच्या हल्ल्यात गाय-म्हैस, शेळी-मेंढी तसेच बैल यांचा मृत्यु झाल्यास पशुपालकांना भरपाई (damage recovery)मिळू शकते. पण त्यासाठी पशुपालकांनी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे.

- पशुपालकांनी जनावर मृत्यु पावल्यापासून ४८ तासांच्या आत नजीकच्या वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

- जंगली प्राण्याने ज्या ठिकाणी जनावर मारले, त्या ठिकाणाहून वनाधिकारी येईपर्यंत जनावरांचे शव हलविता कामा नये.

- जनावराचा ज्या ठिकाणी मृत्यु झाला असेल किंवा जखमी झाला असेल त्या ठिकाणापासून १० किलोमीटर अंतरापर्यंत विष घालून कोणत्याही वन्य प्राण्याचा मृत्यु झालेला नसावा.

- वनाधिकाऱ्याला कळविल्यानंतर वन अधिकारी त्याठिकाणी येऊन पंचनामा करतो. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातच पाळीव प्राणी जखमी झाल्याची खातरजमा करतो.

गाय, म्हैस, बैल यांचा मृत्यु झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा २५,००० यातील कमी असणारी रक्कम मिळते. या उलट अपंगत्व आलेले असल्यास बाजार किमतीच्या ५० टक्के म्हणजे ७५०० रुपये पशुपालकांना मिळू शकतात. शेळी, मेंढी यांचा मृत्यु झाल्यास बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ६००० रुपये यातील कमी असणारी रक्कम मिळू शकते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Vaccination : सोलापूर जिल्ह्यातील साडेसहा हजार जनावरांना लाळया खुरकूत लस

Khandesh Water Storage : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांत जलसंचय वाढला

Nashik Rain : मालेगाव तालुक्यात पावसाचा जोर

Banana Cultivation : पावसामुळे केळी लागवड रखडली

Flood Risk : प्रवरेकाठच्या शंभर गावांना पुराचा धोका

SCROLL FOR NEXT