Bull management for breeding Agrowon
कृषी पूरक

वळूचे योग्य व्यवस्थापन का महत्त्वाचे ?

नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूचे व्यवस्थापन योग्य असल्यास, कळपामध्ये गर्भधारणा घडून येण्याचे प्रमाण वाढेल.

Team Agrowon

पशुपालन करत असताना प्रजननासाठी (breeding) वापरल्या जाणाऱ्या वळूच्या आहाराचे ( bull diet) योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. कारण आहारातील घटकांच्या कमतरतेमुळे वीर्याची प्रत खालावते. परिणामी गायीमध्ये यशस्वी गर्भधारणा होण्याचे प्रमाण कमी होते.

काहीवेळेस गोठयातील जनावरे गाभण राहण्याचे प्रमाण हे नैसर्गिक रेतनासाठी वापरल्या जाणाऱ्या वळूच्या व्यवस्थापनावर देखील अवलंबून असते.

पैदाशीच्या वळूला चांगला आहार दिल्यामुळे पुढील पिढीची उत्पादनक्षमता आणि प्रजननक्षमता टिकून राहण्यास मदत होते. याउलट गरजेपेक्षा जास्त आहार दिल्यास शरीरामध्ये फॅट जमा होऊन वळूचे वजन वाढते. त्यामुळे पायावरील ताण वाढून, नैसर्गिक रेतनाची इच्छा कमी होते.

गरजेपेक्षा कमी आहार दिल्यास पोषणतत्त्वांची कमतरता होऊन प्रजनन क्षमता कमी होते.

वळूचे आहार व्यवस्थापन करत असताना वळूचे वजन व त्याचा नैसर्गिक रेतनासाठी वापर या गोष्टीं विचारात घ्याव्यात. ‍

आहारामध्ये शुष्क पदार्थांचे (dry matter) प्रमाण वजनाच्या जवळपास २ टक्के इतके असावे. नवीन वळूला जीवनसत्त्व-‘अ’ (vitamin- A)ची जास्त आवश्यकता असते त्यामुळे आहारामध्ये हिरव्या चाऱ्याचा (green fodder) मुबलक प्रमाणात समवेश करावा. वळूच्या आहारातील कॅल्शिअमचे प्रमाण वाढवावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Project: कांदा प्रक्रिया उद्योगाला चालना देणार

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखाना केनियातील साखर उद्योगासाठी प्रेरणादायी

CM Fadnavis: नगर-मनमाड खड्डेमय रस्त्यावर मुख्यमंत्र्यांचा प्रवास

Crop Loss Compensation: मागणी ५७० कोटींची, मिळाले ३८ कोटी

Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची

SCROLL FOR NEXT