Feeding the fish through bags helps to save the food
Feeding the fish through bags helps to save the food 
कृषी पूरक

शेततळ्यातील मत्स्यशेतीतील अडचणीवरील उपाय  

डॉ. विजय पांडुरंग जोशी

आपल्या राज्यात मत्स्यतळ्यांमध्ये मासे वाढविणे हे आता उत्पन्नाचे नवीन साधन बनत आहे. साधारणतः कटला, रोहू व सायप्रिनस या माशांचे शेततळ्यात उत्पादन घेतात. त्यामध्ये कोरोनाच्या स्थितीमध्ये काही अडचणी शेतकऱ्यांना जाणवत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना तीन प्रमुख अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्या म्हणजे 

  • मत्स्यखाद्य न मिळणे
  • रोगांचा हल्ला.
  • मासे विक्री.
  • या तिन्हीं समस्यांवर मात करण्यासाठी खालील उपाययोजना उपयोगी ठरतात. मत्स्यखाद्य वेळेत न मिळणे शासनाने जरी माशांचे कृत्रिम खाद्य वाहतूकीला परवानगी दिली असली तरी माशांचे हे खाद्य पर-राज्यातून येते आणि त्या मूळे ते मिळताना बर्याच वेळा उशीर होत आहे. म्हणूनच

  • पुढील तीन महिने खाद्य मिळणार नाही, असे गृहित धरून खाद्य (फ्लोटिंग फिड) मागवून घ्यावे. आपल्या तळ्याजवळ शेडमध्ये व्यवस्थित साठवून ठेवावे. उंदीर, घुशी, मुंग्या हे फीड खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
  • तळ्यात खाद्य वितरीत करताना आवश्यक तेवढेच खाद्य वापरा. या करिता तळ्यातील माशाचे सरासरी वजनानुसार खाद्य द्यावे. या शिवाय तळ्यात नैसर्गिक खाद्याचे (प्लवंग) प्रमाण किती आहे, ते बघावे. प्लवंग चांगले असल्यास कृत्रिम खाद्याचे प्रमाण कमी करावे.
  • माशांची तब्येत बरी नाही किंवा वातावरणात अचानक बदल झाला तर, किंवा अचानक जोरदार पाऊस आला तर त्या दिवशी खाद्य कमी द्यावे.
  • माशांच्या आकाराप्रमाणे खाद्याचा आकार ठरवावा. उदा. माशांचे सरासरी वजन ४०० ग्रॅम असेल तर ४ मि.मि. आकाराचे खाद्य द्यावे.
  • तळ्याचे पाणी अतिशय हिरवे झाले असेल तर (पाण्यातील प्लवंगांमुळे, शेवाळांमुळे नाही) तर १ ते २ दिवस कृत्रिम खाद्य देणे बंद करा.
  • रोज ठरलेल्या वेळेलाच खाद्य टाका. म्हणजे त्यावेळी मासे बरोबर खाण्यासाठी येतील व खाद्य ताबडतोब संपवतील.
  • खाद्य तळ्यात नुसतेच न फेकता खतांच्या रिकाम्या बॅग मध्ये भरा. या बॅगला खालून छोटी छोटी छिद्रे पाडावीत. खांद्याच्या या बॅगा दोरीला बांधून त्याचा खालचा भाग तळ्याच्या पाण्यात बुडेल अशा प्रकारे लटकवावे. या छिद्रातून थोडे, थोडे खाद्य बाहेर येईल. मासे ते खातील. दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये किती खाद्य उरले आहे बघावे. अधिक खाद्य उरले असल्यास खाद्याची मात्रा कमी करावे. अगदीच शिल्लक नसेल तर खाद्याची मात्रा थोडी वाढवावी. खाद्य देण्याच्या या पध्दतीला बॅग फिडिंग असे म्हणतात. असे केल्याने तळ्याच्या तळाशी उरलेले खाद्य जावून वाया जाणार नाही.
  • कृत्रिम खाद्य न मिळाल्यास या काळात कृत्रिम खाद्य शेतकऱ्यापर्यंत पोचण्यामध्ये अडचणी आहेत. विशेषतः एकेकटे शेततळी धारकांना ही समस्या अधिक भेडसावते. अशा वेळी माशांना उपाशी न ठेवता त्यांना भूईमुग पेंड, भाताची किंवा गव्हाची भूशी, डाळींचा भरडा व थोडे अॅग्रोमीन हे सर्व पाण्यात मिसळून त्याच्या गोळ्या करून माशांना खायला द्यावे. या खाद्याला ओले खाद्य असे म्हणतात. अर्थात हे खाद्य रोज ताजे करून माशांना द्यावे.      हे खाद्य ही नेमकेच (Just Sufficient) द्यावे. जरूरीपेक्षा जास्त खाद्य तळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. रोग नियंत्रण मासे रोगग्रस्त होण्याची एक समस्या जाणवते. या स्थितीमध्ये मत्स्यतज्ज्ञ तळ्याला भेटी देऊ देऊ शकत नाहीत. परिणामी योग्य सल्ला मिळण्यामध्ये अडचणी आहेत. या काळात माशांना शक्यतो रोग होणारच नाही, याची काळजी घ्या. या करीता

  • पाण्यात शेवाळे होत असेल तर ते रोजचे रोज काढून टाकावे. शक्य असल्यास चेनिंग करावे. त्यामुळ शेवाळ वर येईल. तसेच अपायकारक वायू पाण्याबाहेर निघून जातील. विशेषतः शेवाळे आणि खाद्य तळाशी साचून राहील्यास अमोनिया हा विषारी वायू पाण्यात तयार होतो. पाणी खराब होऊन माशांना रोग होतात.
  • पाण्याचा पीएच ७ पेक्षा कमी असल्यास १० किलो चूना प्रति १० गुंठे या प्रमाणात वापरा. चुन्यामूळे रोग जंतूनाही काही प्रमाणात आळा बसतो.
  • तळ्यात साधारण रात्री २ ते ५ या वेळात विरघळलेला प्राणवायू कमी होतो. मग मासे विशेषतः सायप्रिनस मरण्याची शक्यता असते म्हणून या कालावधीत पंपाने पाण्याचे पुनर्चक्रीकरण (Recirculation) करावे. तळ्यात कारंजे केले तर फारच उत्तम!
  • विक्री नियोजन

  • सध्या वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने बाहेर बाजारात मासे विकायला नेताना समस्या येत आहेत. शिवाय धडपड करून मासे नेल्यास ते विकले जातील का आणि विकले गेले तरी दर मिळेल का, असे अनेक प्रश्न आहेत. म्हणूनच शेततळ्याचा बांधावरच माशांची विक्री करण्याला प्राधान्य द्यावे. ताजे आणि फणफडीत मासे असल्याने त्याला दरही चांगला मिळू शकेल.
  • माशांची जाहिरात करण्याकरिता सामाजिक माध्यमाचा वापर करावा. अशा प्रकारे काही मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांनी यशस्वीपणे माशांची विक्री केली आहे. वरील उपाययोजना मत्स्य शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतल्यास कोरोनाच्या या संकटाचे संधीत रूपांतर होईल.
  • संपर्क- डॉ. विजय पांडुरंग जोशी, ९४२३२९१४३४ (निवृत्त मत्स्यशास्त्रज्ञ, मत्स्यसंशोधन केंद्र, रत्नागिरी.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Rain : सोमवारपासून पुन्हा पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ऊन आणि उकाडा वाढण्याची शक्यता

    Kharif Planning Review Meeting : आठ लाख हेक्टरवर खरीप पेरण्यांचे नियोजन

    Banana Farming Management : सिंचन, खत व्यवस्थापनावर भर

    Kokan Development : कोकणातील आंबा पिकासाठी स्वतंत्र मंडळ स्थापणार

    Indian Agriculture : शेतातील सेंद्रिय पदार्थाचे पुनर्चक्रीकरण

    SCROLL FOR NEXT