mushroom
mushroom 
कृषी पूरक

अळिंबीचे विविध प्रकार

डॉ. अनिल गायकवाड

जागतिक बाजारात सध्या विविध प्रकारच्या अळिंबी (मशरूम) उपलब्ध आहेत. भारतामध्ये प्रामुख्याने बटन, ऑयस्टर (धिंगरी), भात पेंढ्यावरील मशरूम, दुधी मशरूम, शिताके, हिवाळी अळिंबी, लायन्स मशरूम, कॉर्डीसेप्स इत्यादी अळिंबीची लागवड होते. बटन अळिंबी लागवडीसाठी जास्त खर्च येतो. परंतु धिंगरी, दुधी, भात पेंढ्यावरील अळिंबी या अत्यंत कमी खर्चात व चांगला आर्थिक फायदा मिळवून देणाऱ्या अळिंबी आहेत. त्यामुळे शेतीपूरक किंवा स्वतंत्र व्यवसाय म्हणून या अळिंबी घेता येतात. बटन अळिंबी इंग्रजी नाव ः फील्ड मशरूम व बटण मशरूम.

  • ही अळिंबी प्रामुख्याने उत्तर व पूर्व भारतातील जंगलात वाढते. कुजणारी पाने, तुटून पडलेल्या व कुजणाऱ्या फांद्या, मृत जनावरांचे अवशेष यांसारख्या मृत सेंद्रिय पदार्थांवर पावसाळ्यात येते.
  • या अळिंबीच्या वाढीस थंड हवामान लागते.
  • अळिंबीचा देठ आखूड, घन, गुळगुळीत व पांढऱ्या रंगाचा असतो. देठाच्या मध्यभागी पण वरच्या बाजूला पातळ वळे असतात.
  • लहान अळिंबीची छत्री गोलाकार असते. नंतर ती बहिर्वक्र होत जाते व शेवटी सपाट होते.
  • अळिंबीची पटले बटणावस्थेत पांढरट असतात. छत्री उघडू लागल्यावर ती गुलाबी, तपकिरी व शेवटी काळी दिसू लागतात.
  • घटकद्रव्ये 

  • या अळिंबीमध्ये जलांश ९५.२ टक्के, प्रथिने २.७४ टक्के, कार्बोहायड्रेट १.६ टक्के, चरबी ०.३७ टक्के आणि राख ०.१५ टक्के हे मुख्य घटक असतात.
  • खनिज घटकांमध्ये कॅल्शिअम ०.००२ टक्के, फॉस्फरस ०.१५ टक्के, पोटॅशियम ०.५० टक्के, एकूण लोह १९.५ पी.पी.एम. (उपलब्ध लोह ५.९५ पी.पी.एम.), तांबे १.३५ पी.पी.एम. आणि आयोडीन १३० ते २३० मिलिग्रॅम असते.
  • याशिवाय जीवनसत्वे बी काँप्लेक्स - निकोटिनिक आम्ल ५.८६, रिबोफ्लॅविन ०.५२, पँटोथेनिक आम्ल २.३८, बायोटिन ०.०१८ आणि थायमिन ०.१२ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम, जीवनसत्त्व सी ८.६ मिलिग्रॅम, जीवनसत्त्व क, ड असते.
  • धिंगरी अळिंबी  इंग्रजी  - ऑयस्टर व कँथरेल.

  • ही अळिंबी २-३ इंच उंच आणि तेवढ्याच व्यासाची असते.
  • यामध्ये विविध रंगछटा असलेल्या जाती उपलब्ध आहेत. उदा. करडा, लाल, निळा, गुलाबी, पिवळा इत्यादी.
  • छत्री प्रथम बहिर्वक्र नंतर सपाट आणि अखेरीस वाऱ्यामुळे उलटल्याप्रमाणे दिसू लागते. उलटल्यावर त्याच्या कडा नागमोडी दिसतात.
  • या अळिंबीचे पटल (गिल) जाड, उथळ व गोलाई असलेले असून देठ खाली वाकलेला असतो.
  • या जातीच्या वाढीस २० ते ३० अंश सेल्सिअस तापमान व ७५ टक्के पेक्षा जास्त आर्द्रता लागते.
  • घटकद्रव्ये 

  • धिंगरी अळिंबीमध्ये साधारणतः: बटन अळिंबी प्रमाणेच घटकद्रव्ये असतात.
  • यामध्ये जलांश ९०.०, प्रथिने २.७४ टक्के, कार्बोहायड्रेट १.६ टक्के, चरबी ०.३७ टक्के आणि राख ०.१५ टक्के असते.
  • जीवनसत्वे  थायमिन ३ मिलिग्रॅम, रिबोफ्लॉविन १६० मिलिग्रॅम, ॲस्कॉर्बिक आम्ल १६.४ मिलिग्रॅम. भात पेंढ्यावरील मशरूम 

  • या अळिंबीला चायनीज किंवा वर्म अळिंबी म्हणतात.
  • ही अतिशय जलद वाढणारी अळिंबी असून १५ ते १८ दिवसांत तयार होते.
  • या अळिंबीच्या शाखीय तसेच पुनरुत्पादन अवस्थेसाठी ३० ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ८९ ते ९० टक्के आर्द्रता आवश्‍यक असते.
  • ही अळिंबी ओरिसा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ व पश्‍चिम बंगाल या राज्यांमध्ये समुद्र किनाराच्या भागात मोठ्या प्रमाणात घेतली जाते.
  • महाराष्ट्रामध्ये कोकणात थोड्या प्रमाणात लागवड होते.
  • अळिंबीची छत्री प्रथम घंटेच्या आकाराची व नंतर पसरट होते. रंगाला पांढरट-करडा ते तांबूस पिवळसर असते.
  • ही अळिंबी चवीला छान असून यात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते.
  • दुधी अळिंबी 

  • या अळिंबीस तापमान आणि आर्द्रता जास्त प्रमाणात लागते.
  • वाढीच्या सर्व अवस्थांसाठी २५ ते ३५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७५ ते ८५ टक्के पर्यंत आर्द्रता लागते.
  • ही अळिंबी पूर्णपणे पांढऱ्या रंगाची असून जाडजूड आणि दणकट असते. त्यामुळे काढणीनंतर रंग न बदलता ती जास्त दिवस टिकते.
  • अळिंबीची छत्री ४ ते ५.५ इंच आकाराची असते. देठ बुंध्याशी (डंबेलप्रमाणे) जाड व छत्रीच्या बाजूस निमुळता होत गेलेला असतो.
  • या अळिंबीची साठवण क्षमता इतर अळिंबीपेक्षा जास्त असते.
  • शिताके  इंग्रजी नावे  जापनीज अळिंबी, ब्लॅक फॉरेस्ट, ब्लॅक विंटर, ब्राऊन ओक, चायनीज ब्लॅक, डोंको, ब्लॅक मशरूम, ओरिएंटल ब्लॅक, फॉरेस्ट मशरूम, गोल्डन ओक.

  • ही अतिशय लोकप्रिय व सहज उपलब्ध होणारी औषधी अळिंबी आहे.
  • शाखीय तसेच पुनरुत्पादन अवस्थेसाठी १५ ते २० अंश सेल्सिअस तापमान व ८५ ते ९० टक्के आर्द्रतेची आवश्‍यकता असते.
  • छत्रीचा रंग फिक्कट ते गर्द तपकिरी असून कडा खाली वळलेल्या असतात.
  •  ही अळिंबी अतिशय चविष्ट आणि मटनासारखी स्वाद देणारी असल्यामुळे आवडीने खाल्ली जाते.
  • ताजी आणि वाळलेल्या स्वरूपात ही अळिंबी उपलब्ध असते.
  • खोडाचा वापर दुसऱ्या भाजीला स्वाद व गंध आणण्यासाठी केला जातो.
  • यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व ड तसेच विषाणूजन्य रोगप्रतिकारक गुणधर्म आहेत. यातील लेन्टीनान या घटकांमुळे गाठींमुळे होणाऱ्या कर्करोगास प्रतिबंध होतो.
  • हिवाळी अळिंबी  इंग्रजी नाव-   गोल्डन नीडल किंवा लिली मशरूम.

  •  ही अळिंबी छोट्या ग्लासमध्ये वाढवावी लागते. त्यामुळे ती पांढऱ्या रंगाच्या गुच्छाच्या स्वरूपात वाढते.
  •  याशिवाय लाकूड व गव्हाच्या भुश्‍यासोबत १० टक्के गव्हाचा कोंडा यावर वाढविली जाते.
  •  शाखीय वाढ तसेच पुनरुत्पादन अवस्थेसाठी २० ते २४० अंश सेल्सिअस तापमान आणि ८० ते ८५ टक्के आर्द्रतेची आवश्यकता असते.
  • या अळिंबीच्या सेवनामुळे शारीरिक ताकद वाढून रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच कर्करोगास प्रतिबंध केला जातो.
  • या अळिंबीपासून सूप, सॅलड व इतर अनेक पदार्थ करता येतात.
  • संपर्क ः डॉ. अनिल गायकवाड, ९४२०४९८८१ (लेखक अळिंबी तज्ज्ञ आहेत.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT