बैलांना शिंगाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते.
बैलांना शिंगाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते. 
कृषी पूरक

शिंगांच्या कर्करोगाकडे नको दुर्लक्ष

डॉ. सुरज बोराखडे, डॉ. संजीव पिट्टलावार

शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५ ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते. लक्षणे ओळखून तातडीने उपचार करावेत.

जनावरांची शिंगे ही संरक्षणासोबत शरीराची शोभा वाढवतात. म्हणून शिंगांची निगा राखणे महत्त्वाचे असते. त्यासाठी दैनंदिन सवयी किंवा शेती कामामुळे होणारे आजार लक्षात घ्यायला हवे. शिंगांचा कर्करोग साधारणपणे ५  ते १० वर्ष वयोगटातील जनावरांच्यामध्ये  दिसतो. खच्ची केलेल्या तसेच शेती कामातील बैलांमध्ये हे प्रमाण गाईपेक्षा जास्त आढळते.  कर्करोगाची कारणे 

  • शिगांस तैलरंग लावल्यामुळे त्यातील विषारी घटक शिंगात शोषले जाऊन शिंगात जळजळ होऊन कर्करोग होतो. 
  • शिंगे साळणे किंवा घासणे. शिंगाला सतत इजा होणे. 
  • उन्हात काम करीत असताना सूर्याच्या अतिनील किरणांमुळे कर्करोग होते. 
  • शेतात काम करीत असताना सतत शिंगाला जू घासणे.  शिंगांस सतत दोर बांधून ठेवणे.
  •     कर्करोग कसा ओळखावा ? पहिल्या टप्प्यातील लक्षणे 

  •  टणक, कडक जागेवर शिंग घासणे. 
  •  असमांतरीत शिंगे. 
  •  कर्करोग झालेल्या बाजुच्या नाकपुडीतून रक्तमिश्रीत स्त्राव येतो. 
  •  शिंगाचे बुड मऊ, गरम होते. शिंगाला वेदना होतात. 
  • दुसऱ्या टप्यातील लक्षणे 

  •  शिंग हळूहळू खाली झुकत जाते. 
  •  शिंगांच्या बुडास जखम होते. 
  •  जखमेतून रक्त, पू व घाण वास येतो, तसेच त्याच बाजूच्या नाकातून रक्तमिश्रित स्राव येतो.
  •  कर्करोग झालेल्या शिंगास मारून पाहिल्यास आवाजातील फरक लक्षात येतो. 
  • तिसऱ्या टप्पातील लक्षणे 

  •  शिंग पूर्णतः एक बाजूस झुकते. आपोआप तुटून पडते. 
  •  शिंगाच्या बुडास कर्करोगाची वाढ झालेली दिसते. 
  •  अशक्तपणा, तणाव येतो. भूक मंदावते.
  • शिंगाच्या कर्करोगावर उपचार 

  •  लक्षणे दिसताच त्वरित पशुवैद्यकाकडून उपचार करावेत. 
  •  शस्त्रक्रियाकरून कर्करोग बाधित शिंग बुडापासून काढून टाकावे. 
  •  कर्करोगविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा. 
  • शिंगांचा कर्करोग होऊ नये म्हणून घ्यायची काळजी 

  •  शिंगे साळू किंवा घासू नये. 
  •  विषारी घटक असलेला रंग लावू नये. 
  •  बैलांना कडक उन्हात जास्त वेळ काम लावू नये. 
  •  शिंगाला सतत इजा होणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करावा. 
  •  जू वर आवरण घालावे.
  •  शिंगांवर सतत मारणे अथवा टोचणे बंद करावे. 
  •  वेळोवेळी पशुवैद्यकांचे मार्गदर्शन घ्यावे. 
  • -डॉ. सुरज बोराखडे, ९४०३९०६४३६,

    - डॉ. संजीव पिट्टलावार,८६०५५३४८६४  (पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर )

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    PM Narendra Modi : 'जे १० वर्षात सत्तेत होते, त्यांनी उसाला २०० हून अधिक एफआरपी दिली नाही'; मोदींची सोलापूरात टीका

    Environmental Index : पाणलोट क्षेत्र उपचारांमुळे वाढलेला पर्यावरणीय निर्देशांक

    Agriculture Officer : शेती संपन्न जिल्ह्यातच पाच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायकांची ११४ पदे रिक्त

    Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

    Sankeshwar Banda Highway : संकेश्वर-बांदा महामार्गावरील शेकडो झाडांची कत्तल; पण लागवड कधी?

    SCROLL FOR NEXT