It is important to use good quality semen for purebred milch cows. 
कृषी पूरक

स्वीकारा फक्त दुग्धसमृद्धी रेतमात्रा

भरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर होताना रेतन तंत्रात पशुपालकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. कृत्रिम रेतन हा पशुपालनाच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग आहे.

डॉ.नितीन मार्कंडेय

भरपूर उत्पादक पिढी देणाऱ्या रेतमात्रेचा वापर होताना रेतन तंत्रात पशुपालकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. कृत्रिम रेतन हा पशुपालनाच्या विकासामध्ये महत्त्वाचा भाग आहे. हरियाणामधील प्रयोगशील पशुपालकाची ‘जोगन' गाय दैनंदिन ७६ लिटर दूध देणारी आहे. तिची नवलाई वाटू नये, कारण सगळी जादू घडली आहे कृत्रिम रेतन आणि सजग पशुपालकाच्या शास्त्रीय व्यवस्थापनातून. त्यामुळे आपल्या पशुपालकांच्या गोठ्यातही दुधाळ जोगन गाई निश्चितपणे तयार होऊ शकते. पशुपालकांनी नेहमी सुयोग्य रेतमात्रेची निवड काय करू शकते? याचा विचार करावा. ज्या कृत्रिम रेतन तंत्राचा आपण गाई-म्हशीत अवलंब करणार आहोत, त्या तंत्राचे फायदे माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी गावातील दवाखान्यात कृत्रिम रेतन तंत्राचे फायदे स्पष्टपणे सांगणारे फलक लावावेत. दूध उत्पादनाची किमया सक्षम, दर्जेदार, उच्च क्षमतेच्या रेतमात्रेत असल्याने अनुवंश क्षमतेतून उत्पादनशक्तीची साथ मिळवता येते. रेतमात्रेतून पाच लिटर दूध उत्पादनाची आनुवंशिकता पुढच्या पिढीला देता आली तर पशुपालकाला आहार, व्यवस्थापन आणि आरोग्याची साथ देत पंचाण्णव लिटर दूध गायीकडून प्रती दिवस मिळवता येते. अशा शंभर लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दैनंदिन दूध देणाऱ्या गायी जगातच नव्हे, तर प्रतिकूल समजल्या जाणाऱ्या आखाती देशात आहेत. प्रत्येक पशुपालकाने आपल्या गायी-म्हशींची आजची उत्पादनक्षमता किती, याचा अंदाज घ्यावा. नेहमी दुप्पट दूधक्षमतेच्या वळूची रेतमात्रा वापरली जाईल याचा आग्रह धरावा. यातून सध्याची पिढी ३० ते ३५ टक्के अधिक दूध देणारी मिळेल. विनाकारण महाग आणि दर्जेदार म्हणून विकल्या जाणाऱ्या रेतमात्रांचा आग्रह सामान्य, अल्प दूध उत्पादक गाई-म्हशींसाठी टाळावा. संकरिकरणाचे तंत्र लक्षात घ्या

  • रेतमात्रा निवडताना संकरीकरणाचा नेमका अर्थ समजावून घेतल्यास अयोग्य रेतमात्रा टाळता येतील. संकरीकरणाच्या प्रत्येक पिढीत वाढणारे दूध केवळ विदेशी रक्त प्रमाण वाढूनच मिळते, हा विचार चूक आहे. कारण दूध संकरीकरणाच्या परिणामामुळे वाढते, तर विदेशी रक्त प्रमाणाचे आकडे सामान्य संख्या म्हणून फसवे ठरतात.
  • प्रामुख्याने संकरित गाईमध्ये कृत्रिम रेतन करताना आधी संकरीकरणाचे शास्त्र समजावून घेतल्यास रेतन करणारा फसवू शकणार नाही.
  • प्रत्येक रेतनातून होणारी गर्भधारणा चार घटकांवर अवलंबून असते. यामध्ये माजाची गाय, माज ओळखणारा पशुपालक, रेतन करणारा तज्ज्ञ आणि रेतमात्रा यांची जबाबदारी "एकत्रित आणि संपूर्ण' असते. यांपैकी गाय व रेतमात्रा यांना शिक्षा नाही, मात्र पशुपालक आणि रेतन करणारा यांनी जबाबदारी वाटून घेण्याचे दिवस आल्यास प्रत्येक गाय गाभण दिसेल.
  • आपल्या जनावराचा माजाचा काळ तासामध्ये किती आणि माजाचा बळस काचेसारखा पारदर्शक आहे का याची माहिती देणे पशुपालकाची जबाबदारी असते. रेतन योग्य माज ओळखता येणे ही रेतन करणाऱ्याची मोठी जबाबदारी आहे. रेतन नेहमी योग्य, सक्षम रेतमात्रेने माजाच्या तिसऱ्या टप्प्यात योग्य प्रकारे होईल, याकडे लक्ष द्यावे लागते.
  • योग्य रेतमात्रा उपलब्ध नसल्यास, माज टाळणे इष्ट ठरते, मात्र आहे ती रेतमात्रा वापरून निकृष्ट पिढी निर्मिती नेहमी चूक ठरते. हौसेने देशी गोवंश खरेदी करणाऱ्या प्रत्येक पशुपालकाने त्या गोवंशाच्या रेतमात्रा उपलब्धतेसाठी संपूर्ण पूर्वनियोजन ठेवावे, ही जबाबदारी पशुपालकाची आहे.
  • ‘एकाच रेतनात गर्भधारणा' मिळवण्याचे तंत्र पशुपालक- रेतन करणारा प्रशिक्षित साध्य करू शकतो. यात रेतनानंतरचा पाठपुरावा, तपासणी, निरीक्षणे उपयोगी ठरतात. माजाचा बळस सूक्ष्मदर्शक यंत्राने तपासून खात्री केल्यास ७० टक्के जनावरे गाभण ठरतात, याचा विसर रेतन करणाऱ्या प्रशिक्षितांनी पडू देऊ नये.
  • वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या संकरित गायींसाठी रेतमात्रा पुरवणाऱ्या अधिकृत संस्था, एनडीडीबी, बाएफ यांचा विचार प्राधान्याने करावा. पंधरा लिटरच्या म्हशींसाठी हरियाणा, पंजाब येथून रेतमात्रा मिळवाव्यात.
  • शासनाच्या रेतमात्रा सर्वसामान्य पशुधनासाठी असल्या तरी वळूचे दूध उत्पादन विचारण्याचा नेहमी पाठपुरावा करावा. विदेशी रेतमात्रा व्यावसायिक दूधप्रक्षेत्रावर सरासरी दूध उत्पादन २५ लिटरपेक्षा जास्त असल्यास वापरणे योग्य ठरते.
  • घरचा गोठा दैनंदिन १० लिटर सरासरीच्या दुप्पट करणे शक्‍य झाले नसल्यास, जलदगती मार्गासाठी घेतलेल्या रेतमात्रा उपयोगी पडत नाहीत. हजार- दीड हजाराच्या रेतमात्रा शून्य परिणामांच्या दिसून आल्यास, त्याबद्दल बोलण्याची हिंमत केली जात नाही.
  • शाश्‍वत दुग्धसमृद्धी रेतमात्रेत दडली आहे. ज्यांना पशुविज्ञान कळले तेच तंत्रज्ञानाचा लाभ मिळवू शकतात. विदेशी रेतमात्रा वापरायची असेल तर पशुखाद्य संतुलन, मूरघास, यांत्रिक दोहन, प्रजनन नियंत्रण, प्रतिबंधात्मक उपचार, संगणकीय नोंदी असे आधुनिक तंत्र सोबत अवलंबावे लागते, अन्यथा विदेशी रेतमात्रा चमत्कार घडवू शकत नाही.
  • कृत्रिम रेतन तंत्र सोपे, उपलब्ध आणि स्वस्त असल्यामुळे शासन शिफारस करते. मात्र अवलंबणारी सगळी यंत्रणा या उच्च तंत्रास कंटाळा, दुर्लक्ष, जबाबदारी झटकणे, नोंदी न करणे, कौशल्य शून्यता, पाठपुरावा अभाव अशी सगळी नकारात्मक भारतीय मानसिकता जोडत असल्याने पशुपालक सुखी होत नाही. रेतन करणारा प्रशिक्षित व्यक्ती कार्यरत होणार नाही, तोपर्यंत मानसिकता बदलून सकारात्मक उंची वाढवण्याची गरज आहे. असा पाठपुरावा राज्याला दुग्धसमृद्धीचा विकासमार्ग दाखवे
  • संपर्क- डॉ.नितीन मार्कंडेय, ९४२२६५७२५१ ( लेखक पशूवैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथे सहयोगी अधिष्ठाता आहेत)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

    Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

    Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

    Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

    Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

    SCROLL FOR NEXT