उत्तम वंशावळीसाठी कृत्रिम रेतन 
कृषी पूरक

म्हैसपालनामध्ये उत्तम वंशावळीसाठी कृत्रिम रेतन

डॉ. एम. व्ही. इंगवले

फायदेशीर म्हैसपालनामध्ये उत्तम वंशावळीच्या म्हशींच्या प्रजातीचे संगोपन अाणि दीड वर्षाला एक वेत मिळणे आवश्‍यक आहे. म्हशीपासून जास्तीत जास्त वेत मिळाल्यास जास्त दुग्धोत्पादन होते व उत्तम पिढी तयार होते. म्हशीच्या किमती बाजारामध्ये वाढतच अाहेत, येत्या काळात जातिवंत म्हशीची किंमत जास्तच राहील व जातिवंत म्हैस मिळेल, ही शक्‍यता कमी होईल. कारण बहुतांश म्हैसपालक प्रामुख्याने शहराजवळील म्हैसपालक फक्त दुधासाठी म्हशीचे संगोपन करतात.  म्हैस अाटल्यानंतर नवीन म्हैस खरेदी करतात. त्यामुळे म्हशी गाभण राहण्याचे प्रमाण कमी होते.व्यायलेल्या म्हशींच्या नवजात रेडकांना सहसा विकले जाते. यामुळे नवीन पारड्या तयार होण्याचे प्रमाण अत्यल्प असून, बाजारामध्ये म्हशीच्या कमी संख्येमुळे तुटवडा निर्माण होत आहे. यामुळे म्हैसपालकांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. कारण नवीन म्हैस तयार होण्याकरिता जवळपास साडेतीन ते चार वर्षे लागतात व संगोपन खर्च होतो, असा समज आहे; परंतु नवीन उत्तम पिढीही तयार करणे आवश्‍यक आहे. कारण म्हाताऱ्या, आजारी, प्रजननक्षमता कमी असणाऱ्या म्हशी विकून नवीन म्हशी घ्याव्या लागतात. बाजारातील सरासरी किंमत बघता नवीन म्हैस जवळपास ४० हजार व त्याहून अधिक दराने मिळते.

पैदाशीकरिता कृत्रिम रेतनाचा वापर

  •    म्हैसपालनामध्ये पैदाशीकरिता कृत्रिम रेतनाचा वापर कमी आहे. बहुतांश नर रेडके विकली जातात; कारण त्यांना दूध पाजावे लागते व किंमत मिळत नाही. 
  •    मादी रेडकापासून म्हैस होण्याकरिता अधिक कालावधी व संगोपन खर्चामुळे रेडकांची विक्री केली जाते. 
  •    उत्तम वंशावळीकरिता प्रत्येक वेताला मादी रेडके तयार झाल्यास प्रत्येक म्हशीपासून चार किंवा अधिक म्हशी तयार होऊन जास्त फायदा मिळेल.
  •    प्रत्येक वेताला मादी वासरे तयार होणाऱ्या लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाच्या वीर्यकांड्या उपलब्ध झाल्या असून, यामुळे अधिक मादी वासरे व दुग्धोत्पादन वाढून आर्थिक फायदा होईल. 
  •    पशुवैद्यकीय क्षेत्रातील हे नवीन अद्ययावत तंत्रज्ञान पूर्वी अमेरिका, ब्राझील इत्यादी प्रगत देशांमध्ये उपलब्ध होते. परंतु अाता कृत्रिम रेतनाच्या वीर्यकांड्या महाराष्ट्रामध्येही उपलब्ध आहेत.
  •    म्हशीच्या प्रजातीमध्ये मुऱ्हा या म्हशीच्या लिंगवर्गीकृत वीर्यकांड्या उपलब्ध असून, यांची किंमत १२०० ते १५०० प्रती वीर्यकांडी इतकी आहे. 
  •    मुऱ्हा प्रजातीच्या पैदाशीकरिता व गावठी म्हशीमध्ये वीर्यकांड्याचा वापर चांगली नवीन पिढी व कमी कालावधीमध्ये तयार होईल व दुग्धोत्पादनात वाढ होईल.  
  • लिंगवर्गीकृत कृत्रिम रेतनाचे फायदे 

  •    तंत्रज्ञानामध्ये रेड्याच्या वीर्यामधील X व Y गुणसूत्रे असणारे शुक्राणू हे वेगळे केले जातात. X गुणसूत्रे असणाऱ्या शुक्राणूच्या वीर्यकांडीद्वारे कृत्रिम रेतन केल्यामुळे फक्त मादी रेडकू जन्माला येते.
  •    कृत्रिम रेतनामध्ये गाभण राहण्याचे प्रमाण ३० ते ४० टक्के असून, प्रथम गाभण राहणाऱ्या पारड्यांमध्ये हे प्रमाण अधिक आहे.
  •    कृत्रिम रेतनाच्या वापरामुळे नर रेडके तयार होत नसल्यामुळे प्रत्येक म्हशीपासून चार व अधिक मादी रेडके तयार होतील. यामुळे कमी कालावधीमध्ये अधिक प्रमाणात उत्तम वंशावळीच्या म्हशी तयार होतील. त्यामुळे पुढील काळात दुग्धोत्पादन वाढीला चालना मिळेल.
  •    सदर वीर्यकांडीचा वापर केल्यास ९९ टक्के मादी रेडकू होण्याचे प्रमाण आहे.
  •    गाभण म्हशींना विकताना जास्तीची किंमत मिळू शकेल.
  •  ः डॉ. एम. व्ही. इंगवले, ९४०५३७२१४२ (स्नातकोतर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला.)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Plastic Flower Ban : प्लास्टिक फुलांच्या बंदीबाबत विशेष सूचना काढणार; मुख्यमंत्र्यांनी दिला कडक कारवाईचा इशारा

    Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची योग्य देखभाल कशी करावी? शेतकऱ्यांसाठी सोप्या टिप्स

    Fruit Harvesting Tools: फळे काढणीस उपयुक्त आधुनिक साधने

    Experimental Farming: तरुणांनी प्रयोगशील शेतीकडे लक्ष द्यावे

    Kolhapuri Barrage: कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर करा

    SCROLL FOR NEXT