मृदूअस्थी आजार दुधाळ व गाभण गाई-म्हशींना निव्वळ वाळलेल्या चारा दिल्यामुळे होतो. म्हशींमध्ये हा आजार होण्यास स्फुरदाची कमतरता हेच प्रमुख कारण आहे.
को रडवाहू भागात विशेषतः मराठवाड्यात दुधाळ म्हशींमध्ये उन्हाळ्याच्या दिवसात मृदूअस्थी हा आजार आढळून येतो. ग्रामीण भागात या आजारास ‘उरमोडी’ असे म्हणतात. योग्य उपचाराअभावी आणि अंधश्रद्धेपोटी बरेच पशुपालक आजारी म्हशींच्या छातीच्या भागात डाग देतात. मृदूअस्थी आजार प्रामुख्याने स्थानिक म्हशींमध्ये आढळून येतो. आजार प्रामुख्याने एप्रिल ते जुलै दरम्यान होतो. आजार सर्वसाधारण दुभत्या म्हशी व्यायल्यानंतर ६ ते ८ महिन्यांनी होतो क्वचित गाभण म्हशीतही हा आजार दिसून येतो. म्हशींच्या तुलनेत गायींमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. आजाराची कारणे जमिनीत स्फुरदाची कमतरता
असमतोल आहार
शरीराची वाढती गरज शरीराच्या गरजेनुसार स्फुरद न मिळाल्याने हा आजार होतो. दुधाळ गाई-म्हशींना दूध तयार होण्यासाठी तर गाभण गाई-म्हशींना गर्भाच्या वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर स्फुरदाची आवश्यकता असते. साधारणतः एक लिटर दुधात १ ग्रॅम स्फुरद जाते. यासाठी आहारातून प्रतिलिटर दूधामागे २ ग्रॅम जादा स्फुरद मिळणे आवश्यक असते.म्हणून वाढलेल्या गरजेप्रमाणे आहारातून स्फुरद पुरवणे आवश्यक आहे.
गाई-म्हशींमधील मृदूअस्थी आजार गाई-म्हशींच्या आहारात स्फुरदाची कमतरता असेल किंवा अधिक दूध देणाऱ्या जनावरांत दूधाद्वारे स्फुरद जास्त प्रमाणात जात असेल आणि त्या प्रमाणात आहारातून स्फुरदाची भरपाई होत नसेल तर रक्तातील स्फुरदाचे प्रमाणे कायम ठेवण्यासाठी व दूध उत्पादनासाठी हाडातील स्फुरद शरीरक्रियेद्वारे काढले जाते. त्यामुळे हाडे ठिसूळ होतात. लक्षणे
उपचार
प्रतिबंधक उपाय
- डॉ. अनिल भिकाने, ९४२०२१४४५३ (सहयोगी अधिष्ठाता, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.