Types of Collectible Colorful Fish ...
Types of Collectible Colorful Fish ... 
कृषी पूरक

संवर्धनयोग्य रंगीत माशांचे प्रकार...

विनय सहस्रबुद्धे, डॉ. मनोज घुघूसकर

शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. गप्पी, गोल्डफिश, एंजल, एंजल फिश, डॅनिओ यांसारख्या शोभिवंत माशांना देश-विदेशांत चांगली मागणी आहे. शोभिवंत मत्स्यपालनाला इतकी लोकप्रियता मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विविध रंगसंगती, आकार असणाऱ्या, विविध प्रवर्गातील माशांची मोठ्या संख्येतील उपलब्धता. आजमितीस सुमारे दोन हजार वेगवेगळ्या प्रकारचे शोभिवंत मासे या व्यवसायामध्ये प्रचलित असून, दहा रुपयांपासून ते प्रति नग लाख रुपये एवढ्या किमतीचे मासे बाजारपेठेमध्ये पाहावयास मिळतात. शोभिवंत माशांचे विविध प्रकारे वर्गीकरण करण्यात येते. नैसर्गिक अधिवासानुसार शोभिवंत माशांचे प्रकार  गोड्या पाण्यातील मासे 

  • हे मासे गोड्या पाण्याच्या जलस्रोतांमध्ये असतात.
  • बहुतांशी घरगुती अॅक्वारिअममध्ये विविध प्रकारचे गोड्या पाण्यातील शोभिवंत मासे पाळले जातात.
  • गप्पी, मोली, टेटा, गोल्डफिश, एंजल इत्यादी मासे या प्रकारांत मोडतात.
  • निमखाऱ्या पाण्यातील मासे 

  • हे मासे हे खाडी पात्रामध्ये आढळतात. या पाण्याची क्षारता समुद्रातील पाण्यापेक्षा कमी असते. क्षारता सुमारे १० ते २५ पीपीटी दरम्यान असते.
  • या प्रकारच्या माशांमध्ये थोड्या प्रजाती आहेत. यामध्ये स्कॅट, मोनो एंजल, रॅबीट फिश इत्यादी माशांचा अंतर्भाव होतो.
  • सागरी मासे 

  • या प्रकारातील शोभिवंत मासे हे समुद्रातील पाण्यामध्ये अधिवास करतात.
  • माशांची रंगसंगती, आकार हे अतिशय वैविध्यपूर्ण आणि आकर्षित असते. या माशांची किंमत जास्त असते.
  • यामध्ये बटरफ्लाय फिश, क्लाऊन फिश, ब्लुरिंग, कोंबडा मासा असे अनेक प्रकारचे मासे आहेत.
  • प्रजनन पद्धतीवरून माशांचे प्रकार  पिले देणार मासे :  उदा. गप्पी, मोली, प्लॅटी इ. या प्रकारचे मासे थेट पिलांना जन्म देतात. अंडी देणारे मासे : उदा. गोल्ड फिश, गुरामी, बार्ब, एंजल फिश, डॅनिओ, फायरमाउथ इ. हे मासे अंडी देत असून, त्याद्वारे पिले जन्माला येतात. शोभिवंत माशांपैकी सुमारे ९० टक्के मासे या प्रकारामध्ये अंतर्भूत असून, त्यांच्यामधील अंडी देणाऱ्या पद्धतीनुसार विविध उपप्रकार आढळून येतात.

  • अंडी पसरवणारे मासे : उदा. बार्ब, डॅनिओ इ. या माशांची अंडी चिकट नसून हे मासे अंडी टाकीच्या तळाशी इतर ठिकाणी सोडतात.
  • अंडी इतस्ततः चिकटवणारे मासे : उदा. गोल्डफिश या माशांची अंडी थोड्या प्रमाणात चिकट असून, अंडी सोडल्यानंतर टाकीमधील उपलब्ध पृष्ठभागावर चिकटतात.
  • अंडी चिकटवणारे मासे : उदा. एंजल, डिस्कस, ऑस्कर इ. या प्रकारचे मासे काळजीपूर्वकपणे टाकीमधील उपलब्ध पृष्ठभागावर विशिष्ट प्रकारे अंडी चिकटवतात. या प्रकारच्या माशांमध्ये स्वत:ची अंडी आणि पिलांची काळजी घेण्याची सवय आढळते.
  • घरट्यांमध्ये अंडी देणार मासे : उदा. गुरामी, फायटर फिश इ. या प्रकारचे मासे अॅनाबॅटिड्‍स प्रवर्गात येतात. हे मासे श्‍वसनासाठी हवेतील प्राणवायूचा वापर करतात. प्रजननादरम्यान हे मासे बुडबुड्यांचे घरटे पाण्याच्या पृष्ठभागावर तयार करतात. त्यामध्ये अंडी चिकटवतात.
  • तोंडामध्ये अंडी धरणारे मासे : उदा. मॉर्फ्स, फायरमाउथ, गोल्डन सिक्लीड इ. या प्रकारामधील मासे फलित अंडी तोंडामध्ये धरतात. तेथेच अंड्यातून पिले बाहेर येतात. ही पिलेदेखील काही कालावधीसाठी तोंडामध्ये धरली जातात. यामुळे पिलांचे संरक्षण होण्यास मदत होते.
  • संपर्क : विनय सहस्रबुद्धे, ९४२२४५३१८१ डॉ. मनोज घुघूसकर, ९४०४९९२४५५ (मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प, उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे, जि. सिंधुदुर्ग)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

    Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

    Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

    Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

    Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

    SCROLL FOR NEXT