जनावरांच्या आहारात औषधी वनस्पतींचा वापर फायदेशीर ठरतो 
कृषी पूरक

जनावरांच्या उपचारासाठी शेपू, पळस...

जनावरांच्या आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर प्रथमोपचार म्हणून करावा. याचा फायदा जनावरांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी होतो. पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.

डॉ. स्वाती उमप, डॉ. आरजू सोमकुवर

जनावरांच्या आजारांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर प्रथमोपचार म्हणून करावा. याचा फायदा जनावरांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी होतो. पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा. जनावरांवर उपचार करण्यासाठी औषधी वनस्पतींचा वापर होतो. औषधी वनस्पती वापरल्यानंतर त्यांचा कोणताही अंश जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पादनांत आढळून येत नाही. तसेच कोणताही विपरीत परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होत नाही. आधुनिक उपचार पद्धतींचा खर्च तुलनेने अधिक आहे. त्यामुळे वनौषधींचे महत्त्व जाणून त्यांचा उपचार पद्धतीत करणे फायदेशीर ठरते. शेपू 

  • शेपूची भाजी आणि बिया विशिष्ट सुगंधी गंध उत्सर्जित करतात.
  • शेपूच्या बिया काळ्या मिरीसोबत खाऊ घातल्यास जनावरांची भूक वाढते, पचनशक्ती सुधारते.
  • काही जनावरांमध्ये दूध उत्पादनाचे प्रमाण कमी असते. अशावेळी शेपू बी, कारल्याची पाने आणि एरंडीची कोवळी पाने थोड्या प्रमाणात जनावरांना दिल्यास दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
  • बऱ्याच वेळा पोटफुगीमुळे जनावरांचे खाणेपिणे कमी होते. यासाठी सुंठ २५ ग्रॅम, हिंग ५ ग्रॅम, काळे मीठ १०० ग्रॅम, शेपूचे बी ५० ग्रॅम आणि गूळ ५०० ग्रॅम घेऊन पाण्यात मिसळून मिश्रण अर्धे होईपर्यंत उकळून घ्यावे. आणि थंड झाल्यानंतर जनावरास पाजावे.
  • पळस 

  • पळसाच्या झाडाला उन्हाळ्यात नारंगी रंगाची आकर्षक फुले येतात. पळसाची पाने, बिया, मुळ्यांचा वापर उपचारासाठी केला जातो.
  • पळसाची कोवळी पाने म्हशींना खाऊ घातल्यास दूध उत्पादन वाढते.
  • जनावरांमध्ये कृमिनाशक म्हणून पळसाचे बी उत्तम काम करते. जनावराच्या पोटात कृमी झाल्यास, पालाश बी ७ ग्रॅम आणि ३० ग्रॅम मीठ मिसळून बारीक करावे. तयार चूर्ण १२० मिलि पाण्यात मिसळून दिवसातून २ वेळा जनावरास पाजावे.
  • पळस खोडाची १०० ग्रॅम भुकटी ताकामध्ये मिसळून जनावराच्या पूर्ण शरीरावर लावावी. त्यामुळे गोचीड आणि गोमाशांचा त्रास कमी होतो.
  • वनौषधी वापरताना घ्यावयाची काळजी 

  • ताज्या वनस्पती उपचारासाठी वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात. खराब झालेली, बुरशी लागलेल्या वनस्पती जनावरांमध्ये उपचारासाठी वापरू नयेत.
  • उपचारासाठी वनौषधींचा वापर करण्यापूर्वी पशुवैद्यकांचा सल्ला घ्यावा.
  • औषधी वनस्पतींचा वापर जनावरांचे आरोग्यमान सुधारण्यासाठी नक्कीच होतो. पण सर्व आजारावर औषधी वनस्पती प्रभावीपणे काम करत नाहीत. अशा आजारांच्या उपचारासाठी आधुनिक औषधोपचार पद्धती प्रभावीपणे काम करतात. म्हणून औषधी वनस्पतींचा वापर प्रथोमपचार म्हणून करावा.
  • जनावरांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी समतोल आहार, वार्षिक लसीकरण, स्वच्छता आणि वेळोवेळी पशुवैद्यकांचा सल्ला या बाबी महत्त्वाच्या आहेत.
  • संपर्क ः डॉ. स्वाती उमप, ८१४९७७१९१७ (पशुवैद्यकीय औषधशास्त्र व विषशास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

    ॲग्रोवनचे सदस्य व्हा

    शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

    Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

    India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

    EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

    Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

    SCROLL FOR NEXT